Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कानपूरच्या घटनेच्या निषेधार्थ संगमनेरात मुस्लिम समाजाचा मोर्चा, या केल्या मागण्या!
धार्मिक

कानपूरच्या घटनेच्या निषेधार्थ संगमनेरात मुस्लिम समाजाचा मोर्चा, या केल्या मागण्या!

जर प्रशासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही, तर पुढील संवैधानिक पावले उचलण्यास भाग पडेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – मोहसीन शेख

उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात ‘आय लव्ह मुहम्मद’ (I Love Muhammad) चा बोर्ड लावल्याबद्दल 25 मुस्लिम तरुणांवर दाखल केलेल्या एफआयआरच्या विरोधात संगमनेर येथील मुस्लिम समाजाने आज (सोमवार) जोरदार निषेध व्यक्त केला. शहरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने सय्यदबाबा चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चानंतर, कानपूरमधील अन्यायकारक कारवाईचा निषेध करत, प्रांत अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी स्वीकारले.

काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये बरावफात (मिलाद-उन-नबी) च्या धार्मिक उत्सवादरम्यान, 25 मुस्लिम तरुणांनी ‘आय लव्ह मुहम्मद’ असा बोर्ड रस्त्यावर लावला होता. या संदर्भात संगमनेरमध्ये मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनानुसार, ही कृती पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा एक शांततापूर्ण मार्ग होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी या तरुणांवर एफआयआर दाखल केली. 

या कारवाईला मुस्लिम समुदायाने संविधानाच्या अनुच्छेद 19 (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) आणि 25 (धार्मिक स्वातंत्र्य) चे स्पष्ट उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे देशभरातील मुस्लिम समुदायामध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी निषेध, प्रदर्शने होत आहेत.

या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात, संगमनेरच्या मुस्लिम समाजाने आणि विविध सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या. यात त्यांनी कानपूर येथे दाखल केलेली एफआयआर त्वरित रद्द करून, अटक केलेल्या तरुणांना तात्काळ मुक्त करावे अशी मागणी केली. तसेच, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली, त्यांनी कोणत्या कायदेशीर आधारावर ही कृती केली, याचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय, संबंधित अधिकाऱ्यांवर पक्षपाती आणि अल्पसंख्याकविरोधी कारवाईचा आरोप असल्याने त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

शेवटी, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, यामुळे नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क जपले जातील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो नागरिकांनी ‘आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत आपल्या मागण्या शांततापूर्ण मार्गाने मांडल्या. निवेदनात, जर प्रशासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही, तर पुढील संवैधानिक पावले उचलण्यास भाग पडेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,120
मोर्चा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.