Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजित तांबेंच्या प्रयत्नांमुळे संगमनेर तालुक्यातील तीर्थक्षेत्रांसाठी ५० लाख रुपयांचा निधी
धार्मिक

आमदार सत्यजित तांबेंच्या प्रयत्नांमुळे संगमनेर तालुक्यातील तीर्थक्षेत्रांसाठी ५० लाख रुपयांचा निधी

तालुक्यातील अनेक तीर्थक्षेत्रे पर्यटन विकास योजनेअंतर्गत विकसित केली गेली आहेत. आता नव्याने मंजूर झालेल्या ५० लाख रुपयांच्या निधीमुळे पाच तीर्थक्षेत्रांना नवीन रूप मिळणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर (प्रतिनिधी): राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास सुरूच आहे. तालुक्यात विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, आता आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्यातील पाच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा विकास होणार आहे.
हा निधी श्रीक्षेत्र वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थान आणि इतर चार गावांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मंजूर झाला आहे. आमदार तांबे यांनी वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यापूर्वी वेळोवेळी या देवस्थानला विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे भाविकांना चांगल्या सुविधा मिळत असून, आता या नवीन निधीमुळे विकासकामांना आणखी गती मिळणार आहे.
या मंदिरांना मिळणार निधी:
  • मौजे कसारा दुमारा: श्रीहरी पुरुषोत्तम मंदिरासाठी स्नानगृह व स्वच्छतागृह बांधण्यासाठी १० लाख रुपये.
  • संगमनेर खुर्द: अमृतेश्वर मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये.
  • खांजापूर: अग्नेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये.
  • सायखिंडी: अमर गिरी महाराज मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये.
  • पारेगाव बुद्रुक: रेणुका माता मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये.
या मंजूर निधीमुळे तीर्थक्षेत्रांच्या सुशोभीकरणासोबतच भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल वेल्हाळे, संगमनेर खुर्द, कसारा दुमारा, खांजापूर, सायखिंडी आणि पारेगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांचे आभार मानले आहेत.
बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास- बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात अनेक विकासकामे झाली आहेत. तालुक्यातील अनेक तीर्थक्षेत्रे पर्यटन विकास योजनेअंतर्गत विकसित केली गेली आहेत. आता नव्याने मंजूर झालेल्या ५० लाख रुपयांच्या निधीमुळे पाच तीर्थक्षेत्रांना नवीन रूप मिळणार आहे. विशेषतः हरीबाबा देवस्थानच्या विकासासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हे देवस्थान नाशिक-पुणे महामार्गालगत असल्याने याचा फायदा मोठ्या संख्येने भाविकांना होईल.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 884
तीर्थक्षेत्र निधी सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.