महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
वाळू, खडी आणि मुरुमाच्या वाहतुकीसाठी दरमहा २० हजार रुपयांची लाच (हप्ता) मागणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल अनिल रामनाथ गवांदे (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई राहाता पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली असून, यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांचा खडी, मुरुम आणि वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या खडी भरलेल्या डंपरवर १८ सप्टेंबर २०२५ रोजी राहाता पोलिसांनी कारवाई करत तो जप्त केला होता. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल गवांदे यांनी तक्रारदारांना फोन करून भेटायला बोलावले.
राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यवसाय सुरळीत चालू ठेवायचा असेल आणि डंपरवरील कारवाई टाळायची असेल, तर दरमहा २०,००० रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी कॉन्स्टेबल गवांदे यांनी तक्रारदाराकडे केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २४ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, पोलीस कॉन्स्टेबल गवांदे यांनी २० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी एसीबीच्या पथकाने राहाता पोलीस स्टेशन परिसरात सापळा रचला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे याने तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला तातडीने रंगेहाथ अटक केली.
पोलीस कॉन्स्टेबल अनिल रामनाथ गवांदे याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबी चे पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
पोलीस कॉन्स्टेबल लाच घेताना रंगेहाथ जेरबंद; २० हजारांच्या ‘हप्ता’ मागितला, १५ हजार स्वीकारले
सप्टेंबर २०२५ रोजी एसीबीच्या पथकाने राहाता पोलीस स्टेशन परिसरात सापळा रचला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे याने तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला तातडीने रंगेहाथ अटक केली.



महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
तक्रारदार यांचा खडी, मुरुम आणि वाळू वाहतुकीचा
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २४