Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यात २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान ‘यलो अलर्ट’; मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि पूरस्थितीचा धोका!
प्रशासन

अहिल्यानगर जिल्ह्यात २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान ‘यलो अलर्ट’; मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि पूरस्थितीचा धोका!

जिल्ह्यात या कालावधीत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना अत्यंत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ सप्टेंबर या तीन दिवसांदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात या कालावधीत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना अत्यंत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

धरण विसर्ग वाढल्याने नदीकाठी पूरस्थितीचा धोका- पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नदीकाठच्या नागरिकांना विशेषतः सतर्क राहण्याचे आणि पाणीपातळीत वाढ झाल्यास तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणातून ३७,७२८ क्युसेक, नांदूर मध्यमेश्वर धरणातून ९,४६५ क्युसेक तर भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,९४० क्युसेक इतका प्रचंड विसर्ग सुरू आहे. याशिवाय प्रवरा, मुळा, घोड, सीना या प्रमुख नद्यांवरील धरणांमधूनही मोठा विसर्ग सोडला जात आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

  • वीज आणि वादळ: मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडांखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. तसेच कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेचे सुवाहक भाग (उदा. धातूचे कुंपण, टॉवर्स, खांब) यांच्यापासून दूर राहावे. मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान झाकावे आणि डोके गुडघ्यांमध्ये झाकावे, जेणेकरून जमिनीशी कमीतकमी संपर्क होईल.
  • नदी-नाले आणि प्रवास: नदी, ओढे व नाल्यांवरील पूल किंवा बंधाऱ्यांवरून पाणी वाहत असल्यास ते कोणत्याही परिस्थितीत ओलांडू नये. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणे टाळावे आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची आणि दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच घाट रस्त्याने प्रवास शक्यतो टाळावा.
  • इतर दक्षता: जुनाट/मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये किंवा जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये. पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांक १०७७ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 696
अहिल्यानगर पाऊस येलो अलर्ट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.