Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी DYSP पुत्राचा धुमाकूळ! पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणींना डांबले, शरीरसुखाची केली मागणी; दरोड्याचा गुन्हा दाखल
गुन्हेगारी

माजी DYSP पुत्राचा धुमाकूळ! पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणींना डांबले, शरीरसुखाची केली मागणी; दरोड्याचा गुन्हा दाखल

पीडितेच्या तक्रारीनंतर सौरभ देशमुख आणि वेटर मोहित ताम्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी तत्काळ दोघांना अटक केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

माजी पोलीस उपअधीक्षक (DYSP) यांच्या मुलाने कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देत, दोन तरुणी आणि त्यांच्या मित्राला पिस्तुलाचा धाक दाखवून डांबून ठेवल्याची आणि त्यांच्यावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील ‘कॅटल हाऊस’ या हॉटेलमध्ये हा गंभीर प्रकार घडला. या प्रकरणी हॉटेलचा चालक व सेवानिवृत्त DYSP संजय देशमुख यांचा मुलगा सौरभ देशमुख याच्यासह वेटर मोहित मिलिंद ताम्हाणे यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गंगापूररोडवरील एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हॉटेलात डांबून ठेवत पिस्तुलाचा धाक दाखवून दोघींकडे शरीरसुखाची मागणी करण्यासह अनैतिक व्यवसाय करण्यास सांगितल्याचे फिर्यादीतून उघड झाले आहे. याप्रकरणी सौरभसह हॉटेलातील वेटर मोहित मिलिंद ताम्हाणे यांच्याविरुद्ध विनयभंग, दरोडा, डांबून ठेवण्यासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार घडून चार महिने झाले असून, फोटोग्राफर पीडितेने भीतीपोटी तक्रार केली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी, तिची मैत्रीण आणि त्यांचा मित्र तन्मय पिसोळकर हे तिघे स्कोडा गाडीतून घटनेच्या दिवशी रात्री साडेआठ वाजता त्यांचा पूर्वाश्रमीचा मित्र आणि हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा मोहित ताम्हाणे याच्याकडे त्यांनी सन २०२० पासून उसने दिलेले पैसे मागण्यासाठी ‘कॅटल हाऊस’ हॉटेलमध्ये गेले होते.

यावेळी हॉटेलचा चालक आणि माजी डीवायएसपीचा पुत्र सौरभ देशमुख तेथे आला. पैशांवरून वाद सुरू असतानाच, सौरभने तिघांना शिवीगाळ करत धमकावले. त्याने अत्यंत अश्लील भाषेत, तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली आहे. माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स पुरवल्या जातात, तुम्ही दोघी ‘कॉलगर्ल्स’ म्हणून काम करा, मी तुम्हाला पैसे देईन, असे बोलून शरीरसुखाची मागणी केली.

या प्रकारानंतर तिघांनी तेथून निघण्याचा प्रयत्न केला असता, सौरभ देशमुखने त्यांच्यावर थेट पिस्तूल रोखली आणि शरीरसुखाची मागणी करत त्यांना हॉटेलच्या बाजूला डांबून ठेवले. माझे वडील रिटायर्ड डीवायएसपी आहेत, माझी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख आहे, तुम्ही तक्रार केली तरी ती नोंद होणार नाही, अशी उर्मट धमकीही त्याने दिली.

यादरम्यान, वेटर मोहित ताम्हाणे यानेही पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली आणि पिस्तुलाचा धाक दाखवून, पैसे द्या नाहीतर तुम्हाला येथेच ठोकून टाकतो, अशी ठार मारण्याची धमकी दिली. या धाकाने मोहितने तिघांचे पर्स व वॉलेट हिसकावून त्यातील रोख २१ हजार रुपयांवर दरोडा टाकला.

पहाटे साडेपाच वाजता त्यांची सुटका करण्यात आली. या संपूर्ण प्रकाराने पीडित प्रचंड घाबरले असल्याने त्यांनी तात्काळ तक्रार केली नव्हती. मात्र, मोहित ताम्हाणे याने व्हाट्सअपवर पुन्हा धमकीचे मेसेज पाठवल्यानंतर, तिघांनी एकत्र येत २६ सप्टेंबर २०२५ रोजी म्हसरूळ पोलिसांत फिर्याद नोंदवली.

पीडितेच्या तक्रारीनंतर सौरभ देशमुख आणि वेटर मोहित ताम्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी तत्काळ दोघांना अटक केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,017
गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar प्रतिनिधी | संगमनेर प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांसमोर चाललेला कारभार आणि निष्काळजीपणामुळे संगमनेर शहरातील रस्ते…

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.