Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार खताळ यांनी केली पाहणी; प्रशासनाला मदतीचे दिले निर्देश
नैसर्गिक आपत्ती

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार खताळ यांनी केली पाहणी; प्रशासनाला मदतीचे दिले निर्देश

या नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर शासकीय मदत कशी मिळेल, याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/09/2025Updated:28/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणगाव, शिवापूर, मेंढवन आणि सावरगाव तळ परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढ्यांवरील बंधाऱ्यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेती पाण्याखाली गेली आहे, तसेच दोन शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंती कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या संसाराला मोठा धक्का बसला आहे. या नुकसानग्रस्त भागाची आमदार अमोल खताळ यांनी तातडीने पाहणी करत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.

आमदार खताळ यांना कोकणगाव येथील संजय भोसले यांच्या घराची भिंत पावसाने कोसळल्याची माहिती मिळताच, त्यांनी कोणताही विलंब न करता अधिकाऱ्यांसमवेत कोकणगाव आणि शिवापूर येथील संजय भोसले यांच्या वस्तीवर धाव घेतली. त्यांनी ओढ्याच्या पाण्यातून पायी चालत जाऊन पडलेल्या घराची पाहणी केली.

याच परिसरातील शेतकरी अण्णासाहेब भोसले यांच्या कांद्याच्या पिकात बंधाऱ्याचे पाणी घुसल्यामुळे त्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे, तर बाळू नाना साबळे यांच्या घराची भिंत पडल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. आमदार खताळ यांनी पडलेल्या घरांचा त्वरित पंचनामा करून, या नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर शासकीय मदत कशी मिळेल, याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

वडगाव पान ते माळेगाव हवेली या रस्त्यावरील म्हसोबा ते माळेगाव मार्ग तसेच अमृतेश्वर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी खताळ यांना निवेदन देऊन, अमृतेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढवण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामाबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

यावेळी आमदार खताळ यांच्यासोबत संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता श्याम मिसाळ, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह कोकणगावच्या सरपंच आशा जोंधळे, वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात, ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, भाजपचे हिरामण वायकर, घनश्याम भोसले, लक्ष्मण घोडे, भारत जोंधळे, रामेश्वर जोंधळे, बाळासाहेब जोंधळे, आदिनाथ पवार, महेश जोंधळे यांच्यासह कोकणगाव, शिवापूर, माळेगाव हवेली व वडगाव पान येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 528
अतिवृष्टी पाहणी दौरा अमोल खताळ पाहणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.