Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची संगमनेरमध्ये धडाकेबाज कारवाई: ३ गुन्हे दाखल, ‘वेदांत वाईन शॉप’ही अडचणीत
गुन्हेगारी

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची संगमनेरमध्ये धडाकेबाज कारवाई: ३ गुन्हे दाखल, ‘वेदांत वाईन शॉप’ही अडचणीत

या धडक कारवाईत पोलिसांनी ३,८०,४६०/- रुपये किमतीची विदेशी आणि देशी दारू आणि ती वाहतूक करण्यासाठी वापरलेली दोन वाहने जप्त केली आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/10/2025Updated:02/10/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (१ ऑक्टोबर) अवैध दारू वाहतुकीविरोधात एकाच दिवशी मोठी मोहीम राबवून तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. धडक कारवाईत पोलिसांनी ३,८१,४६०/- रुपये किमतीची विदेशी आणि देशी दारू आणि ती वाहतूक करण्यासाठी वापरलेली दोन वाहने जप्त केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात वेदांत वाईन्सच्या चालक मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार पो.कॉ. बाळासाहेब गुंजाळ, पो.हे.कॉ. गणेश लोंढे, पो.हे.कॉ. संतोष खैरे आणि पो.ना. राहुल डोके यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. विशेष म्हणजे, अवैध विक्री आणि पुरवठा केल्याबद्दल नाशिक रोडवरील ‘वेदांत वाईन शॉपच्या चालक/मालकांवरही दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना होलसेल मालाची विक्री करण्याची परवानगी नसताना त्यांनी दारू विकल्याचे उघड झाले आहे.

अल्टो कारमधून विदेशी दारूची वाहतूक – पो.हे.कॉ. खैरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ५:३६ वाजता संगमनेर ते घुलेवाडी रोडवर दोस्ती हॉटेलसमोर सापळा रचण्यात आला. यावेळी सदु जगन्नाथ मोरे (वय ५६, रा. जवळेकडलग, संगमनेर) याला एम.एच. १७ बी. एक्स ०२६२ या अल्टो कारमधून बेकायदा दारूची वाहतूक करताना पकडण्यात आले. त्याच्याकडून ‘ब्लॅक डिलक्स व्हिस्की’ आणि ‘मॅकडॉल्स नं. ०१ व्हिस्की’चे ३४ क्वार्टर (किंमत रु. ७,२४०/-) आणि अल्टो कार (किंमत रु. ३,००,०००/-) असा एकूण रु. ३,०७,२४०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने ही दारू वेदांत वाईन शॉपमधून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यामुळे सदु मोरे आणि वेदांत वाईन शॉपच्या चालक/मालकांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ८७३/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारसायकलवरून विदेशी दारूची तस्करी – पहिल्या कारवाईनंतर लगेचच मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५:५५ वाजता याच रोडवर रिलायन्स स्मार्ट बाजार समोर दुसऱ्या सापळ्यात रामनाथ चांगदेव शिरसाठ (वय ४५, रा. ढोलेवाडी) आणि उमेश आनंद सदा (वय ३१, रा. वैश्य लगमा, बिहार, ह.मु. संगमनेर) हे दोघे प्लॅटिना मोटारसायकल (एम.एच. १७ सी. एच. ८६४५) वरून अवैध विदेशी दारूची वाहतूक करताना आढळले. त्यांच्याकडून ‘इंपेरियल ब्लु व्हिस्की’चे २९ क्वार्टर (किंमत रु. ६,३८०/-) आणि मोटारसायकल (किंमत रु. ६०,०००/-) असा एकूण रु. ६६,३८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींनीही दारू वेदांत वाईन शॉपमधून घेतल्याची कबुली दिल्याने या दोघांसह वाईन शॉपच्या चालक/मालकांविरुद्ध दुसरा गुन्हा (गुरनं. ८७४/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

देशी दारूची अवैध विक्री – तिसरी कारवाई सायंकाळी ६:११ वाजता संगमनेर ते घुलेवाडी रोडवर १३२ के.व्ही. परिसरात करण्यात आली. पो.हे.कॉ. लोंढे यांना मिळालेल्या माहितीवरून, देशी दारूची गोणी घेऊन उभा असलेल्या संतोष अर्जुन खरात (वय ३६, रा. महात्मागांधी नगर) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून ‘बॉबी संत्रा’ देशी दारूचे १०० (९० मि.ली.) आणि ४८ (१८० मि.ली.) सिलबंद क्वार्टर असा एकूण रु. ७,८४०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संतोष खरात याच्याविरुद्ध पोलीस नाईक राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिसरा गुन्हा रजिस्टर नंबर ८७५/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींना विनापरवाना बेकायदा दारूची वाहतूक आणि विक्री करताना पकडण्यात आले असून, जप्त केलेल्या मालातून रासायनिक विश्लेषणासाठी नमुने पंचांसमक्ष सील करून ठेवण्यात आले आहेत. तसेच संगमनेर पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.


अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संगमनेरमध्ये येऊन कारवाई केल्याने संगमनेर पोलिसांचा सर्व काही अलबेल असल्याचा दावा फोल ठरला आहे. उलट संगमनेरमधील अवैध धंदे स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने चालत असल्याच्या आरोपाला या कारवाईतून दुजोरा मिळाला आहे. शहरातील राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे स्थानिक पोलीस सातत्याने संशयाच्या गर्तेत सापडत आहे. स्थानिक पोलीस यासंदर्भात कठोर कारवाईची भूमिका घेत नसल्याने आता अहिल्यानगर गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस पथक संगमनेरमध्ये कारवाया करत आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराकडे पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,375
अहिल्यानगर एलसीबी गुन्हेगारी छापे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.