Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महात्मा गांधींच्या विचारांची आज देशाला नितांत गरज, लोकशाही वाचवण्यासाठी गांधी विचारांवर आधारित लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद विशेष

महात्मा गांधींच्या विचारांची आज देशाला नितांत गरज, लोकशाही वाचवण्यासाठी गांधी विचारांवर आधारित लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

महात्मा गांधींच्या वेशातील २०० विद्यार्थ्यांची लक्षवेधक प्रभात फेरी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आज केवळ देशालाच नाही, तर जगालाही गरज आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार घेऊन एक मोठी लोकचळवळ उभी करावी लागेल, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

जयहिंद लोक चळवळीच्यावतीने महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती, लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त संगमनेर येथे आयोजित भव्य प्रभात फेरीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, उत्कर्षा रुपवते, डॉ. मैथिलीताई तांबे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, जुलमी ब्रिटिशांविरुद्ध महात्मा गांधी यांनी भारतातील सर्व जाती-धर्मातील गोरगरीब नागरिकांना एकत्र आणून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज जगात व देशात अस्वस्थता असून, देशात द्वेष पसरवला जात आहे आणि जाती-धर्माच्या नावावर भांडणे लावून राजकारणाची पोळी भाजली जात आहे. यामुळे लोकशाही आणि राज्यघटना संकटात आली आहे. त्यामुळे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन ही लोकचळवळ उभी करणे गरजेचे आहे. थोरात यांनी यावेळी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छाही दिल्या.

यावेळी बोलताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, महात्मा गांधी हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाने स्वीकारलेले शांतता आणि अहिंसेचे पुरस्कर्ते होते. सत्य आणि अहिंसा हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. त्यांच्यावर जगात सर्वाधिक म्हणजे सुमारे १ लाख ५ हजार पुस्तके लिहिली गेली असून, ७० देशांमध्ये त्यांचे पुतळे आणि १०५ देशांमध्ये त्यांच्यावर तिकिटे काढली गेली आहेत. गांधीजींमुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला सन्मान मिळतो. त्यांनी युवकांना गांधीजींचे विचार घेऊन पुढे जाण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सत्यजित तांबे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश पारखे व नामदेव कहांडळ यांनी केले, तर जयहिंदचे सचिव डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी आभार मानले.

महात्मा गांधींच्या वेशातील २०९ विद्यार्थ्यांची लक्षवेधक प्रभात फेरी – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरात भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. विविध विद्यालयांमधील २०० विद्यार्थ्यांनी यावेळी महात्मा गांधींची वेशभूषा केली होती, तर एकूण ७०० विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. यशोधन कार्यालय ते संगमनेर बस स्थानकापर्यंत निघालेल्या या प्रभात फेरीत महात्मा गांधींच्या घोषणांसोबतच त्यांच्या भजनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संगमनेर बस स्थानकावर शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय, वैष्णव जनतो तेरे नाम, आणि रघुपति राघव राजाराम या भजनांनी शहर दुमदुमून टाकले.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 455
प्रभात फेरी बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.