महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
कर्तव्य बजावत असताना मद्यसेवन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या एका चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर येथील तारकपूर बसस्थानकात गुरुवारी (दि. २) सायंकाळी उशिरा घडली.
सुरेश चंद्रभान धामोरे (वय ५४, रा. सारोळा कसार) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागात कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक सुरेश धामोरे हे तारकपूर-घोसपुरी बसवर (क्र. एमएच ४० एन ८८८७) कर्तव्यावर होते. त्यांनी दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर ते तारकपूर बसस्थानकात परतले. यावेळी वाहतूक नियंत्रक शिवाजी मारुती खजिनदार यांना ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आला. त्यांनी लागलीच ही बाब आगारप्रमुख अविनाश कोल्हापुरे यांच्या निदर्शनास आणून दिली.
प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने, वरिष्ठांच्या आदेशानुसार धामोरे यांची तोफखाना पोलीस ठाण्यात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालात त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्याविरोधात दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्याच्या धक्क्याने किंवा बदनामीच्या भीतीने धामोरे यांनी तारकपूर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्येच गळफास घेऊन आपले जीवन संपवले, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.
एसटी चालकाची बसमध्येच आत्महत्या
या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.