Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, किरकोळ बदल; १५ प्रभागातून ३० नगरसेवक
निवडणूक

संगमनेर नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, किरकोळ बदल; १५ प्रभागातून ३० नगरसेवक

या प्रभाग रचनेनुसार, सर्वाधिक लोकसंख्या प्रभाग क्र. १३ मध्ये ४९०४, सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग क्र. २ मध्ये ३९६८ मतदार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/10/2025Updated:08/10/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली संगमनेर नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना अखेर जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांनी नोंदवलेल्या ३३ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, त्यात किरकोळ बदल करून ही अंतिम रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभारी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी ही माहिती दिली.

यामुळे आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचालींना गती मिळाली असून, निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांनी त्या दृष्टीने आपल्या परीने आता प्रयत्न सुरू करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या निवडणूक विभागाचे अधिकारी सध्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी तयार करण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत.

प्रारंभी १५ प्रभागांची रचना जाहीर झाल्यानंतर संभाव्य इच्छुक उमेदवारांसह नागरिकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकूण ३३ हरकती नोंदवल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्र. २ मध्ये १७ आणि प्रभाग क्र. ९ मध्ये ५ हरकती होत्या. तसेच, उर्वरित हरकती प्रभाग क्र. ७, ९, १२, १४ आणि १५ मध्ये होत्या.

पालिकेतील अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, नागरिकांनी घेतलेल्या हरकतींचा विचार करून सुरुवातीच्या रचनेत बदल करून अंतिम १५ प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली आहे.

यानंतर आता शहरातील एकूण १५ प्रभागांची रचना अंतिम करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक (एक महिला आणि एक पुरुष) असणार आहेत. त्यानुसार, एकूण ३० नगरसेवकांसाठी ही निवडणूक होणार आहे. पालिका कार्यालयात नवीन प्रभाग रचनेचा नकाशा, तसेच समाविष्ट भागांची हद्द नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रभाग रचनेनुसार, सर्वाधिक लोकसंख्या प्रभाग क्र. १३ मध्ये ४९०४, सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग क्र. २ मध्ये ३९६८ मतदार आहे.

अंतिम प्रभाग रचना पुढीलप्रमाणे…

प्रभाग क्रमांक १- श्रमिक नगर, गोविंद नगर, गणेश नगर, जनता नगर (लोकसंख्या – ४१३६)

प्रभाग क्रमांक २- ऑरेंज कॉर्नर, कुंथुनाथ सोसायटी, सुयोग सोसायटी राम नगर, पद्मनगर, सिध्दी विनायक सोसायटी (लोकसंख्या – ३९६८)

प्रभाग क्रमांक ३- श्रमपरीहार कॉलनी, आनंद नगर, स्वामी समर्थ नगर, मधुबन कॉलनी, पारीजात कॉलनी, भरत नगर, माऊली कृपा कॉलनी (लोकसंख्या -४११७)

प्रभाग क्रमांक ४ – शिवाजी नगर, रेंगे गार्डन परीसर, मेहेर मळा, जाणता राजा मैदान परीसर, विद्या नगर, सौभाग्य मंगल कार्यालय (लोकसंख्या -४५३९)

प्रभाग क्रमांक ५- जनतानगर, चैतन्यनगर, मार्केट यार्ड परीसर (लोकसंख्या -४१६९)

प्रभाग क्रमांक ६ – इंदिरानगर, सह्याद्री विद्यालय, सा. बां. विभाग शासकीय विश्राम गृह (लोकसंख्या -४१२४)

प्रभाग क्रमांक ७- देवाचा मळा, सावता माळी नगर, एस टी स्टैंड, पंजाबी कॉलनी, वकिल कॉलनी, अभंग मळा माळीवाडा, संजय गांधी नगर क्रिडा संकूल (लोकसंख्या -४७२०)

प्रभाग क्रमांक ८- अभिनव नगर, एम.एस.ई.बी. कार्यालय, नविन नगर रोड, लिंक रोड, ताजणे मळा, नवघर गल्ली, अरगडे गल्ली (लोकसंख्या -४४३३)

प्रभाग क्रमांक ९- कुरण रोड, गुंजाळ आखाडा, पानसरे आखाडा, जुना बैल बाजार, ज्ञानमाता विद्यालय, गुंजाळ नगर, पंचायत समिती, पाबळे वस्ती, जब्बार मळा (लोकसंख्या -४२९९)

प्रभाग क्रमांक १० – भारतनगर, रेहमतनगर, जम-जम कॉलनी, अलकानगर, काठे मळा, मौलाना आझाद मंगल कार्यालय, गलांडे मळा (लोकसंख्या -४१२८)

प्रभाग क्रमांक ११- गवंडीपुरा कब्रस्तान, सय्यद बाबा चौक, देवीगल्ली, घासबाजार, उपासणी गल्ली, तेलीखुंट, लखमीपुरा (लोकसंख्या -४५६८)

प्रभाग क्रमांक १२- गांधी चौक, कोष्टी गल्ली, खंडोबा मंदीर, अशोक चौक, मेन रोड, बाजार पेठ, पानसरे गल्ली, स्वामी विवेकानंद चौक, साईनाथ चौक, वडगल्ली, भागवत वाडा, कुंभार आळा, सैय्यदबाबा चौक (लोकसंख्या – ४५४९)

प्रभाग क्रमांक १३- घोडेकर मळा, साईनगर, पंपिंग स्टेशन, चव्हाणपुरा, जेधे कॉलनी, पुर्नवसन कॉलनी स्वामी समर्थ मंदिर, साळीवाडा, संगमनेर नगरपरिषद (लोकसंख्या -४९०४)

प्रभाग क्रमांक १४- रंगारगल्ली, जे. पी. रोड, चंद्रशेखर चौक, पेटिट विद्यालय, नेहरू चौक, वाडेकर गल्ली, परदेशपुरा, अँग्लो उर्दू हायस्कुल, जुने पीडब्लुडी कार्यालय, नायकवाडपुरा मस्जिद व कब्रस्तान (लोकसंख्या – ४७५३)

प्रभाग क्रमांक १५- रुबी टॉवर, नाईकवाडपुरा, डाके मळा, जोर्वे रोड, यंग नॅशनल स्पोर्ट्स ग्राऊंड, पुणे नाका, लखीमपुरा, रहमत नगर, फादरवाडी (लोकसंख्या ४३९७)


मतदार यादीचे काम सुरू – अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे, प्रभागांनुसार मतदार यादी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीनुसारच या निवडणुकीसाठी मतदार असणार आहेत. यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपल्या तयारीला वेग दिल्याचे चित्र आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,797
अंतिम प्रभाग रचना निवडणूक प्रभाग रचना संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026

अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत इथापेंवर दोन आठवड्यांनंतरही गुन्हा दाखल नाही; संगमनेर नगरपालिकेच्या पत्राकडे पोलिसांचे दुर्लक्ष

19/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा, मावा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री…

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.