Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोवंश हत्या बंदीमुळे शेतकरी आक्रमक! शिव आर्मी शेतकरी संघटनेचा नाशिक-पुणे महामार्ग रोखण्याचा ‘अल्टीमेटम’
आंदोलन

गोवंश हत्या बंदीमुळे शेतकरी आक्रमक! शिव आर्मी शेतकरी संघटनेचा नाशिक-पुणे महामार्ग रोखण्याचा ‘अल्टीमेटम’

या आंदोलनाला आता महिलांच्या सहभागाने एक नवी 'धार' मिळाली आहे, कारण शेतकरी कुटुंबातील महिलांनी यात सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 4, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर राज्य सरकारने कोणताही तोडगा न काढल्याने शिव आर्मी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत, संघटनेने थेट नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (NH 60) रोखण्याचा इशारा दिला आहे. सरकारला स्पष्ट शब्दांत ‘अल्टीमेटम’ देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास कोणत्याही क्षणी महामार्गावर ‘चक्का जाम’ करण्याची तयारी संघटनेने केली आहे.

गोवंश हत्या बंदीच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी आज (शनिवारी ४ ऑक्टोंबर) संगमनेर येथील दुर्वे नाना हॉलमध्ये संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कायद्यातील जाचक तरतुदी दूर कराव्यात, भाकड (दूध न देणाऱ्या) जनावरांची योग्य दरात खरेदी करण्याची सरकारी यंत्रणा कार्यान्वित करावी आणि पशुधन सांभाळणाऱ्या गोपालक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक अनुदान जाहीर करावे, अशा प्रमुख मागण्यांवर सखोल चर्चा झाली. सरकारने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या आंदोलनाला आता महिलांच्या सहभागाने एक नवी ‘धार’ मिळाली आहे, कारण शेतकरी कुटुंबातील महिलांनी यात सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे. बैठकीत महिलांनी आपली भूमिका मांडत, मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका स्पष्ट केली. महिलांच्या या तयारीमुळे आंदोलनाची तीव्रता आणि व्याप्ती वाढणार असल्याचे दिसून येते.

जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि कायद्यातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले नाहीत, तर आम्ही शांत बसणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा संघटनेच्या नेत्यांनी सरकारला दिला आहे.

या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आता नाशिक-पुणे महामार्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास, संघटनेचे कार्यकर्ते कोणत्याही क्षणी महामार्गावर उतरून वाहतूक पूर्णपणे ठप्प करतील. या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यास प्रवाशांचे आणि माल वाहतुकीचे मोठे हाल होण्याची भीती आहे.

शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या या कडक इशाऱ्यानंतर राज्य सरकार काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय उपाययोजना करते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,132
आंदोलन गोवंश हत्या बंदी शिव आर्मी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरकरांच्या हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, संगमनेरकरांनी आता रस्त्यावर उतरावे!

June 30, 2026

राजकीय गद्दारीच्या विरोधात माकप राज्यभर तीव्र निदर्शने करणार: डॉ. अजित नवले

June 21, 2026

संगमनेरमध्ये उबाठा गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांकडून गद्दारी करणाऱ्या खासदार वाकचौरे विरोधात आंदोलन; ७ जणांसह इतर आंदोलकांवर गुन्हा

June 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

आजचे राशिभविष्य मेष – आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. गजकेसरी…

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.