Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूल कोमात, वाळूमाफिया जोमात! संगमनेर शहर पोलिसांची धडक कारवाई; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

महसूल कोमात, वाळूमाफिया जोमात! संगमनेर शहर पोलिसांची धडक कारवाई; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल पारधी हे करत आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/10/2025Updated:07/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पोलिसांनी दाखवली तत्परता, महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह

संगमनेर: अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नदीपात्रालगत ‘घिरट्या’ मारण्यात व्यस्त असताना, संगमनेर शहर पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाने या गंभीर घटनेवर अद्यापही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कोल्हेवाडी रोड परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक लोखंडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवर तात्काळ विश्वास ठेवून, त्यांनी आपल्या पथकासह कोल्हेवाडी रोड पोलीस चौकीजवळ रात्री १:३० वाजता पाळत ठेवली. यावेळी, विना नंबर प्लेट आणि वाळूने भरलेल्या सिल्वर पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा झेनॉन गाडीचा पोलिसांनी पाठलाग करून तिला ताब्यात घेतले.

गाडीचा चालक ज्ञानेश्वर सुरेश लोटे (वय २५, रा. साईनगर) याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना अवैध वाळूची वाहतूक करत असल्याची कबुली दिली.

वाळूचे उत्खनन आणि वाहतूक यावर नियंत्रण ठेवण्याची थेट जबाबदारी महसूल विभागाची असताना, वाळू माफियांना पकडण्याचे काम शहर पोलिसांना का करावे लागले, हा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. महसूल विभागाचे अधिकारी केवळ नदीच्या वेगवेगळ्या भागांना ‘भेटी’ देण्यात आणि नियम धाब्यावर बसवण्यात व्यस्त असल्याने, अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीचा उत्साह अजूनही जोरात असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. महसूल विभागाच्या या निष्क्रियतेमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असून, पर्यावरणाचा समतोलही बिघडत आहे.

पोलिसांनी वाळूसह वाहन ताब्यात घेतले असून पोलीस कॉन्स्टेबल शरद बाबुराव पोकळे यांच्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी ज्ञानेश्वर लोटेविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ८९०/२०२५ नुसार बी.एन.एस. कलम ३०३ आणि २ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईतील एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल पारधी हे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,025
वाळू कारवाई शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.