Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026

आज गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

27/08/2026

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजीत तांबेंची तत्परता! संगमनेरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोरून जप्त वाहने अखेर हटली
सामाजिक

आमदार सत्यजीत तांबेंची तत्परता! संगमनेरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोरून जप्त वाहने अखेर हटली

सत्यजीत तांबेच्या या लोकहिताच्या मागणीची दखल उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ घेतली. केवळ पाच दिवसांतच, म्हणजेच आज 8 ऑक्टोबर 2025 रोजी, या मागणीवर तत्काळ कार्यवाही झाली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: आमदार सत्यजीत तांबे यांचे प्रत्येक गोष्टीवर किती बारीक लक्ष असते, याचे आणखी एक उदाहरण संगमनेरकरांना पाहायला मिळाले आहे. शहरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेली, कारवाईत जप्त केलेली वाहने हटविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर बुधवारी ही वाहने काढण्यात आली.

मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या कार्यालयासमोरच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्यामुळे याच ठिकाणी समाजबांधव मोठ्या संख्येने जमून जयंती, महापरिनिर्वाण दिन यासह अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, वर्षानुवर्षे पडून असलेल्या या जप्त वाहनांमुळे कार्यक्रमांच्या आयोजकांना प्रचंड त्रास होत होता. तसेच, हा परिसर नागरिकांच्या वर्दळीचा असल्याने वाहतुकीसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही वाहने दुसरीकडे हलवणे गरजेचे होते.

नागरिकांची ही अडचण आणि सार्वजनिक जागेचा प्रश्न लक्षात येताच, अभ्यासू आमदार सत्यजीत तांबे यांनी तातडीने पाऊल उचलले. त्यांनी 3 ऑक्टोबर 2025 रोजी संबंधित विभाग ज्यांच्या नेतृत्वात येतो, त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली.

सत्यजीत तांबेच्या या लोकहिताच्या मागणीची दखल उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ घेतली. केवळ पाच दिवसांतच, म्हणजेच आज 8 ऑक्टोबर 2025 रोजी, या मागणीवर तत्काळ कार्यवाही झाली. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित अधिकाऱ्यांना जप्त वाहनांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केवळ पाच दिवसांच्या आत सार्वजनिक हिताच्या प्रश्नाची सोडवणूक झाल्याने आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याची यात तत्परता दिसून येते. या निर्णयामुळे आता संगमनेरातील नागरिकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना महामानवांच्या पुतळ्यासमोर आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. तांबे यांच्या या कृतीमुळे त्यांच्या बारकाईने लक्ष देण्याच्या आणि तत्परतेने काम करण्याच्या ‘पॅटर्न’ची आता शहरात चर्चा सुरू झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 833
राज्य उत्पादन शुल्क सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

By Annant Ppangarkar27/08/20260

संगमनेर | मोहसीन शेख –   ईद-ए-मिलाद निमित्ताने बुधवारी (२६ ऑगस्ट) संगमनेर शहरात काढण्यात आलेला ईद…

आज गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

27/08/2026

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.