महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून, कॉलेजला जाणाऱ्या मुलींची छेड काढण्याचा उद्देश असलेला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्याबद्दल दोन तरुणांवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, (४ ऑक्टोबर २०२५) श्रीरामपूर येथील शाहिद हुसेन शेख (वय २१) आणि सात हशम सय्यद (वय २०) या दोघांनी परिसरामध्ये एक व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. व्हिडिओमध्ये हे दोन्ही तरुण श्रीरामपूरहून लोणी येथील कॉलेजला आलेल्या मुलींची टिंगल-टवाळी करण्यासाठी आल्याचे बोलताना दिसत होते.
त्यांच्या या व्हिडिओचा उद्देश केवळ मुलींची छेड काढणे असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी तातडीने या दोन्ही तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांची वरील प्रमाणे नावे व पत्ता निष्पन्न झाला.
लोणी पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत स्वत: फिर्याद दाखल केली आहे. आरोपींविरुद्ध लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ५४८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६२ आणि ७९ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२ आणि ११७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास लोणी पोलीस निरीक्षक वाघ हे करत आहेत.
पोलिसांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे. अटकेनंतर या दोन्ही आरोपींनी आपल्या बेकायदेशीर वर्तनाची माफी मागणारा व्हिडिओही प्रसारित केला आहे.
दरम्यान पोलीस विभागाने आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम यांवर प्रसारित होणाऱ्या विविध पोस्ट्स आणि व्हिडीओंवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. कोणीही व्यक्ती अशा प्रकारे गैरवर्तन करून किंवा आपत्तीजनक पोस्ट प्रसारित करत असल्यास, पोलीस स्वत: फिर्यादी होऊन त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करत आहेत. महिला आणि मुलींशी संबंधित गैरप्रकार करणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस विभागाने दिला आहे.
- महिला सुरक्षा आणि सन्मान राखण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून, शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींनी किंवा महिलांनी असे गैरप्रकार किंवा गैरवर्तन होत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्यामुळे अशा गैरवर्तन करणाऱ्यांवर तातडीने गंभीर कारवाई करणे शक्य होईल, असे आवाहन श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.
कॉलेजला आलेल्या मुलींची टिंगल-टवाळी, आक्षेपार्ह इंस्टाग्राम व्हिडिओमुळे दोन तरुणांवर गुन्हा दाखल, पीडितांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांचे आवाहन
गैरवर्तन होत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्यामुळे अशा गैरवर्तन करणाऱ्यांवर तातडीने गंभीर कारवाई करणे शक्य होईल, असे आवाहन श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.



महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

त्यांच्या या व्हिडिओचा उद्देश केवळ मुलींची छेड काढणे असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी तातडीने
पोलिसांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे.