Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध कत्तलखान्यांवर पोलीस अधीक्षकांचे धडक अभियान; ५ आरोपींवर गुन्हा दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

अवैध कत्तलखान्यांवर पोलीस अधीक्षकांचे धडक अभियान; ५ आरोपींवर गुन्हा दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त

पळून गेलेल्या आरोपींमध्ये मुश्ताक कुरेशी, आदिल कुरेशी, अब्दुल करिम कुरेशी, शाहिद युनुस कुरेशी, आणि साजीद युनुस कुरेशी (सर्व रा. ममदापूर ता. राहाता) यांचा समावेश आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – स्थानिक गुन्हे शाखेचे (L.C.B.) पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश कारवाई केली. या कारवाईत सुमारे साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध कत्तलखाने आणि गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर माहिती काढून कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग आणि दिपक मेढे यांच्यासह पोलीस अंमलदार सुनिल पवार, संतो, खैरे, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, प्रमोद जाधव, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, चंद्रकांत कुसळकर, आणि भगवान धुळे यांचे पथक तयार करण्यात आले होते. 

या पथकाला जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याचे ठिकाण आणि अवैध कत्तलखान्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गुरुवारी (९ ऑक्टोंबर) पथक लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असताना त्यांना एक गुप्त माहिती मिळाली. मुश्ताक कुरेशी नावाचा इसम आणि त्याच्या साथीदारांनी गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणले असून त्यांची कत्तल केली जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने त्वरीत ममदापूर येथे जाऊन खात्री केली असता, त्यांना काटवनामध्ये गोवंशीय जनावरे बांधलेली दिसली. तसेच, त्या ठिकाणी एका स्विफ्ट कारमध्ये (क्र. एम.एच. ०२ ए. पी.२९२१) काही इसम गोमांस भरताना दिसले. या आरोपींना पथकाची चाहूल लागली आणि ते सर्वजण तात्काळ तेथून पळून गेले. पळून गेलेल्या आरोपींबाबत तेथे उपस्थित असलेल्या लोकांकडे विचारपूस केली असता त्यांची नावे पथकाच्या चौकशीत निष्पन्न झाली.

पळून गेलेल्या आरोपींमध्ये मुश्ताक कुरेशी, आदिल कुरेशी, अब्दुल करिम कुरेशी, शाहिद युनुस कुरेशी, आणि साजीद युनुस कुरेशी (सर्व रा. ममदापूर ता. राहाता) यांचा समावेश आहे.

या कारवाईदरम्यान, पोलीसांनी घटनास्थळावरून ५,१०,०००/- रुपये किंमतीची १४ गोवंशीय जिवंत जनावरे, ५,००,०००/- रुपये किंमतीची स्विफ्ट कार (क्र. एम.एच. ०२ ए. पी.२९२१) आणि २,४०,००/- रुपये किंमतीचे अंदाजे ८०० किलो गोमांस असा एकूण १२,५०,००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पळून गेलेल्या पाच आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सुनिल रमेश मालणकर यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५५०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३ (५), तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम क. ५, ५ (अ), ५ (व), ५ (क), ९, ९ (व) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम ३ व ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 874
अहिल्यानगर एलसीबी गोवंश कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.