Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करावी; सरकारी आकडेवारी फसवी – बाळासाहेब थोरात
राजकारण

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करावी; सरकारी आकडेवारी फसवी – बाळासाहेब थोरात

सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी असून, तो राज्यघटनेवर आणि मूलभूत तत्वांवरचा हल्ला आहे. सध्या देशात दहशतवाद सुरू झाला असून, लोकशाही वाचवण्यासाठी मोठी लढाई लढण्याची आवश्यकता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक/संगमनेर: राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने तत्काळ त्यांच्या पाठीशी उभे राहून संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सध्या सरकारने जाहीर केलेली मदत आणि आकडेवारी ही फसवी असून, त्यातून शेतकऱ्यांचे काहीही भले होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

ते नाशिक रोड येथे आयोजित उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार डॉ.शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीष कोतवाल, बी. एम. संदीप, आकाश छाजेड, हनीफ बशीर, गणेश पाटील, मुन्ना ठाकूर, डॉ. सचिन सावंत, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, रईस शेख, ॲड. संदीप पाटील, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे, शाहू खैरे, गौरव सोनार, माया काळे, उद्धव पवार, स्वाती जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झाला आहे आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने विना अट दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली होती. परंतु, सध्याच्या सरकारने निवडणुकीत दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन आता पाळण्याची खरी गरज आहे. शेतकऱ्यांना प्रति एकरी पुरेशी मदत जाहीर करून त्यांना संकटातून उभे राहण्यास पाठबळ द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी थोरात यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी असून, तो राज्यघटनेवर आणि मूलभूत तत्वांवरचा हल्ला आहे. सध्या देशात दहशतवाद सुरू झाला असून, लोकशाही वाचवण्यासाठी मोठी लढाई लढण्याची आवश्यकता आहे. यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 272
काँग्रेस कार्यकर्ता बैठक बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्या तालुक्याने अत्यंत कष्टातून, घामाच्या धारा गाळून आपले वैभव उभे केले,…

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.