Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाचखोरीच्या प्रकरणात पोलिसालाच अटक
महाराष्ट्र संवाद विशेष

लाचखोरीच्या प्रकरणात पोलिसालाच अटक

वाघाटे यांना तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- 

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका पोलिसाला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. 

विशाल वाघाटे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

३० वर्षीय तक्रारदाराविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याची तक्रार प्राप्त झाली होती. या गुन्ह्यात योग्य ती मदत करण्यासाठी तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कर्मचारी विशाल वाघाटे याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ८ ऑक्टोबर रोजी प्राप्त झाली. ९ ऑक्टोबरला या तक्रारीची पडताळणी करण्यात आली, यात आरोपी पोलीस वाघाटे यांनी लाचेची मागणी केल्याचे आणि पहिल्या हप्त्यात तीन लाख रुपये स्वीकारण्याचे कबूल केल्याचे सिद्ध झाले.

त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि काल सकाळी (१० ऑक्टोबर) वाघाटे यांना तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. महाड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रायगडच्या लाचलुचपत विभागाच्या प्रमुख पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांनी दिली.

पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईत पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, नारायण सरोदे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, सुषमा राऊळ, पोलीस हवालदार महेश पाटील, सुमित पाटील, परम ठाकूर, सिचन आटपाडकर, पोलीस शिपाई मोनाली पाटील, अनंत घरत, सागर पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 632
लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.