Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये गोवंश मांसाची तस्करी उघड! १७ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाला पकडले तर दोघे अटकेच्या भीतीने पसार
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये गोवंश मांसाची तस्करी उघड! १७ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाला पकडले तर दोघे अटकेच्या भीतीने पसार

पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पकडलेला आरोपी अल्ताफ सलीम शेख आणि पळून गेलेले आरोपी मोहंमद अतीक रफीक कुरेशी उर्फ सोन्या व अरबाज सादिक शेख यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/10/2025Updated:11/10/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: पोलीस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरातील रहेमतनगर परिसरात छापा टाकून गोवंश जातीचे मांस तस्करी करताना रंगेहाथ एका आरोपीला पकडले, तर गोमांसाचा मालक आणि एका वाहनाचा मालक असलेले दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत सुमारे १७ लाख रुपयांचे गोमांस आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (११ ऑक्टोंबर) सकाळी ०७.०५ वाजता पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संगमनेर शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, रहेमतनगर येथे मोहंमद अतीक रफीक कुरेशी ऊर्फ सोन्या (रा. बुद्ध विहारचे बाजूला नाशिक पुणे हायवे, संगमनेर) याच्या मालकीच्या दोन वाहनांमध्ये गोवंश मांस भरलेले आहे. खात्रीशीर बातमी मिळाल्याने डीवायएसपी सोनवणे यांनी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय चिंधु मेंगाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल रघुनाथ कडलग, पोलीस नाईक बापुसाहेब सुर्यभान हांडे यांना घटनास्थळी जाऊन खात्री करण्यास सांगितले.

पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन खाजगी वाहनाने सकाळी ०८.५० वाजता रहेमतनगर येथील नमूद ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोन वाहने उभी दिसली आणि तीन इसम उपस्थित होते. पोलिसांना पाहताच तिघेही पळू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून तिघांपैकी एका आरोपीला पकडले. पकडलेल्या इसमाचे नाव अल्ताफ सलीम शेख (रा. नाटकी, संगमनेर) असे आहे. त्याने पळून गेलेल्या इतर दोन आरोपींची नावे मोहंमद अतीक रफीक कुरेशी उर्फ सोन्या आणि अरबाज सादिक शेख (रा. रहेमतनगर, संगमनेर) अशी सांगितली.

पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तपासणी केली असता, महिंद्रा पिकअप (क्र. एम.एच. १७ बी.वाय. ८५८०) आणि टाटा इन्ट्रा (क्र. एम.एच. ४८ सी.बी. ८८२१) या दोन वाहनांमध्ये गोवंश जातीचे कत्तल केलेले मांस भरलेले आढळले. पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमध्ये पकडलेला आरोपी अल्ताफ सलीम शेख याची मालकी असलेली सुमारे ५,५०,०००/- रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची टाटा इन्ट्रा कंपनीची गाडी (क्र. एम.एच. ४८ सी.बी. ८८२१) जप्त करण्यात आली. या गाडीमध्ये अंदाजे २,००,०००/- रुपये किंमतीचे (१००० किलो, रु. २००/- प्रति किलोप्रमाणे) गोमांस मिळून आले.

तसेच, पळून गेलेला आरोपी अरबाज सादिक शेख याची मालकी असलेली सुमारे ६,५०,०००/- रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी (क्र. एम.एच. १७ बी.वाय. ८५८०) देखील जप्त करण्यात आली. या पिकअप गाडीत अंदाजे ३,००,०००/- रुपये किंमतीचे (१५०० किलो, रु. २००/- प्रति किलोप्रमाणे) गोमांस मिळून आले.

पकडलेल्या आरोपी अल्ताफ सलीम शेख याने दोन्ही वाहनांमधील एकूण २,५०० किलो गोमांस पळून गेलेला आरोपी मोहंमद अतीक कुरेशी उर्फ सोन्या याचे असल्याचे सांगितले आहे.

या घटनेचा पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय चिंधु मेंगाळ यांनी दोन पंचांसमक्ष ‘ई साक्ष’ ॲपद्वारे पंचनामा केला. जप्त केलेल्या गोमांसाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी, संगमनेर यांच्यामार्फत घेण्यात आले आहेत.

तर पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पकडलेला आरोपी अल्ताफ सलीम शेख आणि पळून गेलेले आरोपी मोहंमद अतीक रफीक कुरेशी उर्फ सोन्या व अरबाज सादिक शेख यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७१, ३२५, ३(५) सह, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५, ५(क), ९, ९(अ) प्रमाणे संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,564
कत्तलखाना छापा कुणाल सोनवणे गोवंश कारवाई राहुल सारबंदे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.