Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
अपघात

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब बांबळे यांच्यासह पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/10/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. शनिवारी (दि. ११ ऑक्टोंबर) सकाळी दहा वाजेच्या सुमारास आनंदवाडी शिवारात भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बबन इघे (वय ३१, रा. खडकवाडी, ता. पारनेर) हे त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून लघुशंकेसाठी थांबले होते. त्याच वेळी दत्तात्रेय देवराम गाडगे (वय ४९, रा. लोणी, ता. राहाता) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि हयगयीने चारचाकी वाहन चालवून उभ्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेमुळे दुचाकीस्वार सचिन इघे यांना गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब बांबळे यांच्यासह पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी इघे यांना रुग्णवाहिकेतून संगमनेरमधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुणे-नाशिक महामार्गावरील या सततच्या अपघातांमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,577
अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.