Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मानवतेचा झरा… घाबरू नकोस! जखमी प्रगतीला थोरातांनी दिला आधार; बिबट्यांना रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
सामाजिक

मानवतेचा झरा… घाबरू नकोस! जखमी प्रगतीला थोरातांनी दिला आधार; बिबट्यांना रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

आपण वनमंत्र्यांशी बोलणार असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्यास सांगणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या व डिग्रस येथे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रगती सखाराम श्रीराम हिची शनिवारी रात्री राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत तिची आपुलकीने चौकशी केली. यावेळी त्यांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले.

डिग्रस येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात शिकणारी प्रगती शनिवारी सकाळी शाळेत जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात प्रगतीच्या मानेला मोठ्या जखमा झाल्या असून ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या वेळी तिच्या पाठोपाठ येत असलेले प्रगतीचे मामा देवराम खेमनर यांनी दाखवलेल्या धाडसामुळे तिचा जीव वाचला. खेमनर यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मोटरसायकल शेतात घालून हॉर्न वाजवला आणि मोठा आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने प्रगतीला सोडून पळ काढला. या घटनेमुळे डिग्रस व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच दौऱ्यावर असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शहरात येताच तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रगतीच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांनी प्रगतीशी संवाद साधून तिला खंबीर राहण्याचा सल्ला दिला. तसेच, प्रगतीचे मामा देवराम खेमनर यांनी प्रसंगावधान राखून दाखवलेल्या धाडसाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी प्रगतीच्या पालकांशी आणि मामा खेमनर यांच्याशीही संवाद साधून घटनेची माहिती घेत सविस्तर चर्चा केली.

या प्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “सध्या बिबट्यांचे मानवी वस्तीत वाढते हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. बिबटे मानवी वस्तीत शिरत असून वन विभागाने यावर अत्यंत प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.” याबाबत आपण वनमंत्र्यांशी बोलणार असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्यास सांगणार आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या या संवेदनशील भेटीबद्दल आणि त्यांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल उपस्थित ग्रामस्थ व पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 649
बाळासाहेब थोरात बिबट्या हल्ला भेट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.