संगमनेर – संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी किनारी असलेल्या शिवप्रभात ट्रस्ट देवस्थानच्या भक्तनिवासात रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) सकाळी एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने संपूर्ण पठार भागात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊराव विठ्ठल बाचकर (वय ३५, रा. करकवाडी वावरथ जांभळी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. हा खून की घातपात, याचा कसून तपास घारगाव पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मांडवे बुद्रुक येथील मुळा नदीकिनारी असलेल्या शिवमंदिरात रोज सकाळी भाविक दर्शनासाठी जातात. रविवारी सकाळी काही भाविक दर्शनासाठी गेले असता, त्यांना भक्तनिवासातील सभामंडपात भाऊराव बाचकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्याखाली मोठ्या प्रमाणात रक्त साचले होते. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, घारगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक आदिनाथ गांधले यांच्यासह पोलिस नाईक दत्तू चौधरी, पो.कॉ. महादेव हांडे, चंद्रकांत मेढे, अमृता नेहरकर, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, संतोष फड आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, ठसा तज्ञांचे पथकही दाखल झाले होते.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, मयत भाऊराव बाचकर यांच्या डोक्याखाली मोठ्या प्रमाणात रक्त आढळून आले. त्यांच्या शेजारीच एक दगड आणि काही बांगड्यांच्या काचा पडलेल्या होत्या. पोलिसांनी संशयास्पद आढळून आलेल्या या सर्व वस्तू पुढील तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत.
भाऊराव बाचकर हे शनिवारी सायंकाळी मांडवे बुद्रुक येथील लिंबफाटा येथे आले होते आणि त्यानंतर ते शिवमंदिराकडे गेले असल्याची चर्चा होती. मात्र, बाचकर यांच्या मृत्युमागे काहीतरी मोठं कारण असल्याचा संशय परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
त्यांचा मृत्यू खून आहे की अन्य घातपातामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी बाचकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. बाचकर यांच्या मृत्युमागचे खरे कारण पोलिसांच्या तपासातून लवकरच समोर येईल. घारगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
शिवमंदिरातील भक्तनिवासात तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात, परिसरात खळबळ; खून की घातपात? घारगाव पोलिसांकडून तपास सुरू
बाचकर यांच्या मृत्युमागचे खरे कारण पोलिसांच्या तपासातून लवकरच समोर येईल. घारगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.