Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आधी वाढदिवसाचे सेलिब्रेशन मग प्रियकराकडून प्रेयसीचा केकच्या चाकूने गळा चिरून खून! हृदयद्रावक घटना; दुसऱ्या प्रियकराच्या संशयावरून हत्याकांड
गुन्हेगारी

आधी वाढदिवसाचे सेलिब्रेशन मग प्रियकराकडून प्रेयसीचा केकच्या चाकूने गळा चिरून खून! हृदयद्रावक घटना; दुसऱ्या प्रियकराच्या संशयावरून हत्याकांड

प्रेयसीची हत्या केल्यानंतर दिलावर सिंग याने स्वतःहून जवळच्या कोंढवा पोलिस ठाण्यात हजर होऊन 'मी माझ्या प्रेयसीची हत्या केली आहे,' असे सांगून गुन्ह्याची कबुली दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड शहरातून प्रेमसंबंधातील त्रिकोणातून घडलेली एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि क्रूर घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या संशयाने आणि संतापाने एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा निघृण खून केला आहे. वाढदिवस एकत्र साजरा केल्यानंतर प्रियकराने केक कापण्यासाठी वापरलेल्या चाकूने प्रेयसीचा गळा चिरल्याची ही धक्कादायक घटना वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

या घटनेत मेरी मल्लेश तेलगू या तरुणीचा खून झाला असून, तिच्या प्रियकर दिलावर सिंग (वय २५) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलावर सिंग आणि मृत मेरी मल्लेश तेलगू हे दोघे २०१७ पासून प्रेमसंबंधात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मेरीचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय दिलावरला होता, यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. मेरीने आपल्या दुसऱ्या प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच दिलावरचा संताप वाढला आणि त्याने खुनाचा कट रचला.

घटनेच्या दिवशी दिलावरने मेरीला पिंपरी-चिंचवडमधील काळाखडक परिसरातील एका लॉजवर बोलावले. तिथे दोघांनी एकत्र केक कापून मेरीचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे सेलिब्रेशन संपताच दिलावरने मेरीचा मोबाईल तपासला. मोबाईलमध्ये मेरी आणि तिच्या कथित दुसऱ्या प्रियकराचे काही आक्षेपार्ह फोटो त्याला दिसले.

मोबाईलमधील फोटो पाहताच दिलावरचा संताप अनावर झाला. त्याने क्षणाचाही विलंब न करता, केक कापण्यासाठी वापरलेला चाकू उचलला आणि मेरीवर सपासप वार केले. हे वार इतके गंभीर होते की, यात मेरीचा जागीच मृत्यू झाला. ज्या हातात केक कापला, त्याच हाताने आणि त्याच चाकूने प्रियकराने आपल्या प्रेयसीचा जीव घेतल्याने या घटनेवर अधिकच क्रूरतेची किनार चढली आहे.

प्रेयसीची हत्या केल्यानंतर दिलावर सिंग याने स्वतःहून जवळच्या कोंढवा पोलिस ठाण्यात हजर होऊन ‘मी माझ्या प्रेयसीची हत्या केली आहे,’ असे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. कोंढवा पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती वाकड पोलिसांना दिली. त्यानुसार, वाकड पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,296
गुन्हेगारी हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.