Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘डिजिटल अरेस्ट’चा नवा डाव: सरन्यायाधीशांच्या नावाचा वापर करून सेवानिवृत्ताला ७२ लाखांना गंडा
गुन्हेगारी

‘डिजिटल अरेस्ट’चा नवा डाव: सरन्यायाधीशांच्या नावाचा वापर करून सेवानिवृत्ताला ७२ लाखांना गंडा

त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप कॉलचा वापर केला. बँकेत आधारकार्डद्वारे क्रेडिट कार्ड मार्फतीने गुन्हेगारी स्वरूपाचे आर्थिक व्यवहार झाल्याचे खोटे सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी नाशिकमध्ये एक धक्कादायक फसवणूक केली आहे. न्यायव्यवस्थेचा धाक दाखवून ७२ वर्षीय सेवानिवृत्त वयोवृद्धास ‘डिजिटल अरेस्ट’ करून तब्बल ७२ लाख रुपये आरटीजीएसव्दारे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. १२ ऑक्टोबर रोजी ही मोठी रक्कम लाटण्यात आली असून, शहर सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरिक गंगापूर रोड परिसरात राहतात. २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अज्ञात सायबर चोरट्यांच्या टोळीने त्यांना लक्ष्य केले. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी सप्टेंबरच्या अखेरीस सरन्यायाधीश नाशिकमध्ये आले असतानाच, चोरट्यांनी त्यांच्या नावाचा वापर केला.

चोरट्यांनी वयोवृद्धाच्या दैनंदिन बँक खात्याची माहिती मिळवून संपर्क साधला. तुम्ही भ्रष्टाचार केला आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यासाठी ही ऑनलाइन नोटीस स्वीकारा आणि माहिती द्या, असे सांगत त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याची धमकी दिली. यामुळे ते वयोवृद्ध नागरिक प्रचंड भयभीत झाले.

त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप कॉलचा वापर केला. बँकेत आधारकार्डद्वारे क्रेडिट कार्ड मार्फतीने गुन्हेगारी स्वरूपाचे आर्थिक व्यवहार झाल्याचे खोटे सांगितले. तुमचे आर्थिक व्यवहार चुकीचे नसतील, तर आम्ही तुमचे सर्व पैसे परत देऊ. त्यासाठी ते चेक करण्यासाठी तुमचे सर्व पैसे एका खात्यावर पाठवा, अशी मागणी केली. याचसोबत, त्यांना तीन दिवस घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले. फसवणूकदारांनी चक्क ‘नाशिक जिल्हा न्यायालयाचा सेटअप’ दाखवून सरन्यायाधीश भूषण गवई बोलत असल्याचे भासवले आणि त्यांना पूर्णपणे धाक दाखवला.

या धाकदडपशाहीमुळे वयोवृद्धांनी १२ ऑक्टोबर रोजी आरटीजीएसद्वारे तब्बल ७२ लाख रुपये चोरट्यांच्या खात्यावर हस्तांतरित केले. ही फसवणूक उघडकीस येताच नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. शहर सायबर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास सुरू केला असून, नागरिकांना अशा प्रकारच्या ‘डिजिटल अरेस्ट’ आणि न्यायव्यवस्थेच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 398
डिजिटल अरेस्ट डिजिटल फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.