Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठाकरे सेनेच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीने शिवसैनिकात उत्साह, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताकद दाखवून देऊ : नवनियुक्त जिल्हाप्रमुख सचिन कोते
राजकारण

ठाकरे सेनेच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीने शिवसैनिकात उत्साह, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताकद दाखवून देऊ : नवनियुक्त जिल्हाप्रमुख सचिन कोते

जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, येत्या निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी तयारीला लागा.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सच्चा शिवसैनिकांचा सन्मान करत उमेदवारी दिली जाणार आहे. विरोधकांना या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ताकद दाखवून दिली जाईल. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाणार असली तरी आघाडी झाली नाही तर सर्वत्र संपूर्ण ताकतीने उमेदवार दिले जाणार असून त्यांच्या विजयासाठी पराकाष्टा केली जाईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सचिन होते यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मावळते जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना पक्षाने पदावरून हटविल्यानंतर शिवसेनेच्या उत्तर नगर जिल्हा प्रमुखपदी सचिन कोते आणि जगदीश चौधरी यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. नवनियुक्त दोन्ही जिल्हा प्रमुखांनी मंगळवारी संध्याकाळी संगमनेरला भेट देत येथील कार्याचा निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला.

यावेळी माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्या पुढाकारातून या दोन्ही जिल्हाप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. जुन्यांना हटवून नव्या जिल्हाप्रमुखांना पक्षाने नियुक्त्या दिल्याने जुनी मरगळ झटकून ठाकरेंचे शिवसैनिक आता रणांगणात उतरल्याचे दिसत आहे. 

शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत उत्तरेमध्ये झालेल्या संघटनात्मक बदलांचे स्वागत करण्यात आले. तसेच तालुक्यातील अनेक निष्ठावंत शिवसैनिक युवा सैनिक व महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, येत्या निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी तयारीला लागा. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका ठामपणे महायुतीच्या विरोधात राहणार असून निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवायची की स्वतंत्र याबाबतचा निर्णय पक्षीय पातळीवर होईल. या निर्णयाप्रमाणे आपण सर्व काम करू.

अमर कतारी म्हणाले, ज्या-ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या-त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार व बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी श्रीरामपूर येथील अशोक थोरे, कोपरगाव येथील भरत मोरे यांनी देखील मार्गदर्शन केले. असलमभाई शेख, पैलवान गगन हाडा, शुभम वाघ आदी यावेळी उपस्थित होते.

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, गोविंद नागरे, योगेश खेमनर, वैभव अभंग, अमोल डुकरे, सचिन साळवे, रवींद्र कानकाटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक दीपक साळुंके यांनी केले तर असिफ तांबोळी यांनी आभार मानले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 823
अमर कतारी आढावा बैठक जगदीश चौधरी शिवसेना उद्धव ठाकरे गट सचिन कोते
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.