Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘शिव महापुराण’ कथेच्या गर्दीत हातसफाई करणारे टोळके जेरबंद! महाराष्ट्र-यूपीमधील २६ चोरटे पकडले, नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी!
गुन्हेगारी

‘शिव महापुराण’ कथेच्या गर्दीत हातसफाई करणारे टोळके जेरबंद! महाराष्ट्र-यूपीमधील २६ चोरटे पकडले, नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी!

कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल तेवीस महिला व तीन पुरुषांना अटक केली असून त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/10/2025Updated:16/10/2025No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रीरामपूर – १२ ते १६ ऑक्टोंबर दरम्यान निर्मळ पिंपरी येथे आयोजित केलेल्या शिव महापुराण कथेच्या निमित्ताने देश-परदेशातून जमलेल्या लाखो भाविकांची हातसफाई करत त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या, दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरराज्यीय टोळक्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २३ महिलांसह २६ आरोपींना अटक केली. यांच्या विरोधात लोणी (राहाता), शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

कथेदरम्यान भाविकांचे मौल्यवान दागिने वस्तू चोरी जात असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शिर्डीचे डीवायएसपी अमोल भारती, श्रीरामपूरचे डीवायएसपी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी, राहता, लोणी या ठिकाणी पायी पेट्रोलिंग, हॉटेल, लॉज चेकिंग, संशयित गुन्हेगारांवर पाळत तसेच नाकाबंदी करून कार्यक्रमाच्या ठिकाणी चोरी दरोडा यासारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. 

शिवमहापुराण कथेच्या अनुषंगाने प्रदीप मिश्रा यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन भाविक महिला व पुरुषांच्या अंगावरील दागिने मौल्यवान वस्तू यांची संगणमताने घातक शस्त्रासह चोरी करून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या शिल्पा पप्पू कुमार, पुनम राजेश कुमार, अंजली संदीप कुमार, पूजा हनुमान कुमार, दुलारी घुरण कुमार (सर्व रा. उत्तर प्रदेश) व उन्नी सुरेश चंद्र पवार (रा. राजस्थान) या सहा महिलांना पोलीस पथकाने कटर ब्लेड अशा घातक शस्त्रासह साईबाबा मंदिराच्या परिसरात पकडले. पकडलेल्या महिलांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक काळे याप्रकरणी तपास करत आहे.

पोलिसांनी दुसरी कारवाई १२ ऑक्टोंबर रोजी पिंपरी ते लोणी रस्त्याच्या कडेला असलेल्या न्यू इंग्लिश शाळेजवळ केली. या कारवाईत गर्दीचा फायदा घेऊन भाविक महिला व पुरुषांच्या अंगावरील दागिने मौल्यवान वस्तू यांची घातक शस्त्रासह चोरी करून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या शिंदू वीरू राखडे, देवकाबाई मनीष हातांगळे, छाया गोविंद हातागळे, भारती कालीन नाडे, पूजा पंकज लोंढे, नंदिनी गुलशन राखडे, उज्वला शिवा सकट, वर्षा निलेश खंडारे, दुर्गा संजय राखपसरे, नंदा संजय सकट, सागर रमेश डोंगरे, नितीन जगदीश समुद्रे आणि सचिनकुमार सुखदेव महतो अशा 13 जणांना पकडण्यात आले. पकडलेल्या आरोपीकडे स्विफ्ट डिझायर गाडी व घातक शस्त्रे आढळून आल्याने त्यांच्या विरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करत आहे. 

तिसऱ्या कारवाईमध्ये १४ ऑक्टोबरला साईबाबा मंदिराच्या सोळा गुंठे परिसरात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करून दरोडा घालण्याच्या उद्देशाने फिरणारी टोळी पकडण्यात आली यात लाली लक्ष्मण सिंग, रुक्मिणी गोपाल सिंग, लच्चो लक्ष्मण सिंग, सितो प्रेम सिंग, कौशल्या हुकुमसिंग व भटेरा सिताराम सिंग (सर्व रा. हरियाणा) यांना ब्लेड, कटर अशा घातक शस्त्रासह पकडण्यात आले. त्यांचे इतर साथीदार गरजेचा फायदा घेऊन पसार झाले. यातील दोघांना अटक करण्यात आले असून सर्व आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळके याप्रकरणी तपास करत आहेत. 

चौथी कारवाई पोलिसांनी १५ ऑक्टोंबरला कथेच्या मुख्य प्रवेशद्वारावर केली. या कारवाईत काजल मनीष मालवी, चंद्रवती लोधुकुमार हरजन, मायादेवी अमरकुमार हरजन, पुष्पादेवी जयस्वालकुमार हरजन, मालादेवी बिसालकुमार हरजन या पाच महिलांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चाकू, कटर, ब्लेडसारखी घातक शस्त्रे मिळून आली असून त्यांच्या विरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विखे करत आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल तेवीस महिला व तीन पुरुषांना अटक केली असून त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. कारवाईमध्ये शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके, आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे अरुण धनवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळके, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विखे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.


  • धक्कादायक बाब म्हणजे काल पकडण्यात आलेल्या एका महिला चोरांच्या टोळीकडे तर महाराजांच्या पुढील दोन वर्षात ज्या ज्या ठिकाणी कथा होणार आहे त्या कथांचे तारीख, ठिकाण इत्यादी सविस्तर माहिती त्यांच्याकडे असणाऱ्या डायरीमध्ये मिळून आली. स्थानिक पोलिसांकडून ही माहिती त्या त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला कळविली जाणार आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,182
गुन्हेगारी शिवपुराण कथा सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar मोहसीन शेख | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात…

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.