

संगमनेर – संगमनेर शहरामध्ये एका कॉलेजमध्ये मजुरी करणाऱ्या महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीतून समोर आला असून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात या संदर्भातील अधिक माहिती समोर येणार आहे.
एका तीस वर्षीय वयाच्या महिलेने या संदर्भात आरोपी विरोधात फिर्याद दिली असून आरोपीचे पूर्ण नाव अद्याप उपलब्ध झाले नाही. या संदर्भात मंगळवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत चांगुलपणाचा आव आणीत तिचा गैरफायदा घेत तिचे सोबत 4 एप्रिल 2025 पासून 23 सप्टेंबर 2025 यादरम्यान पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचे म्हटले आहे. अत्याचाराचा हा प्रकार कॉलेजमधील एका खोलीत घडला असून ते कॉलेज भाजपाशी संबंधित एका पदाधिकाऱ्याचे आहे.
तसेच या प्रकाराबाबत तक्रार केल्यास फाशी घेऊन सुसाईड नोट मध्ये तुझे नाव टाकण्याची धमकी दिले असल्याचे फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 913/2025 भारतीय न्याय सहिता कलम 62(2)(m), 352(2) पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान यासंदर्भात पुढील तपास करत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार,

