Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘ऑपरेशन गुजरात’ यशस्वी! अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या
गुन्हेगारी

‘ऑपरेशन गुजरात’ यशस्वी! अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या

पथकाने त्वरित सुरत, गुजरात येथे धाव घेतली आणि आरोपी निलेश उर्फ सोन्या अशोक सावंत (वय २९ वर्षे, रा. चिंभळी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला तसेच अपहृत अल्पवयीन मुलीला सुरत येथून ताब्यात घेतले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – श्रीगोंदा तालुक्यातून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने गुजरात राज्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे अपहृत मुलीची सुटका झाली असून, तिच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी मिळून येत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी उपोषणकर्त्यांना मुलीचा तात्काळ शोध घेण्याचे आश्वासन दिले आणि स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने आरोपीला ताब्यात घेऊन मुलीचा शोध घेण्याचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे एक पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक माहिती आणि व्यावसायिक कौशल्याचा उपयोग करून आरोपी आणि अपहृत मुलगी गुजरात राज्यात पळून गेल्याची माहिती मिळवली.

पथकाने त्वरित सुरत, गुजरात येथे धाव घेतली आणि आरोपी निलेश उर्फ सोन्या अशोक सावंत (वय २९ वर्षे, रा. चिंभळी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला तसेच अपहृत अल्पवयीन मुलीला सुरत येथून ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला व अल्पवयीन मुलीला पुढील तपासाकरिता बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. बेलवंडी पोलीस ठाणे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 804
अहिल्यानगर एलसीडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar मोहसीन शेख | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात…

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.