मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे अस्त्र उपसत केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज (१९ ऑक्टोबर) मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बोगस मतदार याद्यांचा गंभीर मुद्दा उपस्थित करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महायुतीमधील आमदारांपर्यंत सर्वांचे जुने व्हिडीओ जाहीर सभेमध्ये दाखवून त्यांची पोलखोल केली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्थानिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. माझ्याकडे आलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, जवळपास ९६ लाख मतदार यादीत घुसवले आहेत. प्रत्येक शहरात लोकं घुसवले आहेत. असे होणार असेल तर निवडणुका कशासाठी घेता? मतं द्या, नाही तर नका देऊ मॅच फिक्स आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. निवडून आलेले आमदारही या प्रकारामुळे आवाक झाले होते, असे सांगत त्यांनी सध्याची लोकशाही ही कोणती, असा सवाल उपस्थित केला. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर सत्ताधाऱ्यांना राग येतो, कारण त्यांनी शेण खाल्लं आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’ असे म्हणत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ च्या निवडणूक प्रचारातील भाषण दाखवले. या भाषणात मोदींनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करत सवाल केले होते. मी काय वेगळं बोलत आहे? त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हाचे त्यांचे हे भाषण आहे, असे राज ठाकरे म्हणाले. जुन्या भाषणात मोदींनी बंगाल, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात ‘रिगिंग’ आणि हिंसाचार होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
केवळ मोदीच नव्हे तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदारांच्या भाषणांचे व्हिडीओही दाखवले. त्यांची हिंमत कुठपर्यंत गेली आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतो की मी निवडणुकीला २० हजार मतदार बाहेरून आणले, असे सांगत त्यांनी पैठणचे आमदार विलास भुमरे यांचा व्हिडीओ दाखवत शिंदेसेनेवर टीका केली. महाराष्ट्रातील मतदारांचा आपमान ते जाहीर मंचावरून करत आहेत. हे २० हजार मतदार बाहेर आणले त्यातूनच त्यांची सत्ता आली, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे जुने व्हिडीओ दाखवत सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले.
मतदार याद्यांमध्ये कथितरित्या करण्यात आलेल्या फेरफारांवरून राज ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगाला आव्हान दिले. बोगस मतदार याद्या नीट होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणूक होऊ देणार नाही, असे थेट आव्हान त्यांनी या वेळी दिले.
निवडणुका घेऊनच दाखवा, राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’चा बॉम्ब; मोदींसह सत्ताधारी आमदारांची पोलखोल
बोगस मतदार याद्या नीट होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणूक होऊ देणार नाही, असे थेट आव्हान त्यांनी या वेळी दिले.