Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रणजितसिंह देशमुख यांचा विश्वास: संगमनेर तालुक्याच्या अर्थकारणाची गुरुकिल्ली ‘दूध व्यवसाय’; ८२ कोटींचे वितरण
शेती व सहकार

रणजितसिंह देशमुख यांचा विश्वास: संगमनेर तालुक्याच्या अर्थकारणाची गुरुकिल्ली ‘दूध व्यवसाय’; ८२ कोटींचे वितरण

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सन १९७७ साली दूध संघाची स्थापना केली. त्यांच्या आदर्श विचारांवर दूध संघाची यशस्वी वाटचाल चालू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – दूध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे, असे प्रतिपादन संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना मोठी आर्थिक मदत देण्यात आली आहे. दूध संघाच्या माध्यमातून दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस व मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण दूध उत्पादकांना ४१ कोटी रूपये त्याचबरोबर दूध संघाशी संलग्न असणाऱ्या सहकारी दूध संस्थांनी सुध्दा ४१ कोटी रूपये असे एकूण ८२ कोटी रूपये दूध उत्पादकांना अदा करण्यात आले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

देशमुख पुढे म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सन १९७७ साली दूध संघाची स्थापना केली. त्यांच्या आदर्श विचारांवर दूध संघाची यशस्वी वाटचाल चालू आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली दूध उत्पादकांच्या हिताची सातत्यपूर्ण काळजी घेतली जात असून दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्धव्यवसायाला फायदेशीर ठरतील असेच निर्णय घेतले जातात.

संगमनेर दूध संघाची वार्षिक उलाढाल ५५० कोटी असून, दूध उत्पादकांना वर्षभरामध्ये ४७५ कोटी रूपये दूध खरेदीपोटी दिले जातात. दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून नियमितपणे १५ दिवसाला पेमेंट होत असल्याने दूध उत्पादकांचे अर्थकारण व्यवस्थित चालू असते. दिवाळीनिमित्त येणाऱ्या मोठ्या रक्कमेमुळे मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. ग्रामीण भागातील या अर्थकारणावरच शहराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. 

दूध उत्पादकांकडील रक्कम ही शहरातील व्यापाऱ्यांकडे विविध प्रकारच्या खरेदीच्या माध्यमातून हस्तांतरीत होत असते. त्यामुळे संपुर्ण तालुक्याचीच अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. तालुक्यातील सहकारी संस्थांमुळे संगमनेरची बाजारपेठ ही जिल्ह्यात सर्वात मोठी बाजारपेठ बनलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशमुख यांनी यावेळी आवाहन केले की, सहकारी चळवळ अधिक मजबूत करावयाची असल्यास दूध उत्पादकांनी सहकारी संघाला ताजे, स्वच्छ व निर्भेळ दुधाचा पुरवठा करावा व ग्राहकांनी देखील सहकारी दूध संघांने निर्माण केलेले दर्जेदार व शुध्द ‘राजहंस’ दुग्धजन्य पदार्थ खरेदी करावे.

याप्रसंगी दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र पाटील चकोर, संचालक लक्ष्मणराव कुटे, विलासराव वर्पे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, रमेश गुंजाळ, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रविंद्र रोहम, भारत मुंगसे, प्रमोद पावसे, प्रतिभाताई जोंधळे, मंदाताई नवले, तसेच कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी मान्यवर उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 622
रणजीतसिंह देशमुख राजहंस दूध लक्ष्मीपूजन संगमनेर तालुका दूध संघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.