Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मातंग समाजाच्या तरुणाला गावगुंडांकडून अमानुष मारहाण; प्रकाश आंबेडकरांचा पीडित कुटुंबाला फोनद्वारे धीर, आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची मागणी
गुन्हेगारी

मातंग समाजाच्या तरुणाला गावगुंडांकडून अमानुष मारहाण; प्रकाश आंबेडकरांचा पीडित कुटुंबाला फोनद्वारे धीर, आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची मागणी

या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून, दलित समाजातून संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/10/2025Updated:23/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात ऐन सणासुदीच्या काळात एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना घडली आहे. जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजाच्या संजय वैरागर या तरुणाला गावातील १५ ते २० गावगुंडांनी अमानुष मारहाण केली. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी फोनद्वारे पीडित तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आहे.

नेमकी घटना काय? – सोनई येथील रहिवासी असलेल्या संजय वैरागर या मातंग समाजाच्या तरुणाला त्याच गावातील १५ ते २० गुंडांनी गावातून उचलून अज्ञात स्थळी नेले. तिथे त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. या गुंडांनी क्रूरतेची हद्द ओलांडत तरुणाच्या हात-पायांवरून मोटारसायकल चालवून हात-पाय मोडले. इतकेच नव्हे तर ‘फायटर’ नावाच्या शस्त्राने तोंडावर जबर मारहाण केल्याने त्याचा एक डोळा निकामी झाला. या विकृत गुंडांनी एवढ्यावरच न थांबता पीडित तरुणाच्या तोंडावर आणि शरीरावर लघवी करण्याचा घृणास्पद प्रकार केला आणि नंतर त्याला एका अज्ञात स्थळी टाकून पळ काढला.

https://x.com/VBAforIndia/status/1981317208019259481?t=Cg0c83xuCvmaI7fq_iCvhQ&s=19

आरएसएसच्या गुंडांकडून मारहाण झाल्याचा आरोप- वंचित बहुजन आघाडीने आरोप केला आहे की, हे गावगुंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित आहेत. वंचितच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देत, मातंग तरुणाला आरएसएसच्या गावगुंडांकडून मारहाण झाल्याचे म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी साधला संवाद- मारहाणीत गंभीर जखमी झालेला संजय वैरागर सध्या अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव प्रा. किसन चव्हाण यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली. याचवेळी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी फोन करून पीडित तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांनी कुटुंबीयांची व्यथा समजून घेत, लवकरच भेटायला येणार असल्याचे सांगून त्यांना धीर दिला.

आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची मागणी- प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रा. किसन चव्हाण यांना आरोपींविरुद्ध ‘मकोका’ (MCOCA – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, उत्तरचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून, दलित समाजातून संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 773
क्राईम गुन्हेगारी प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.