Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये एलसीबीचा कत्तलखान्यावर धडाकेबाज छापा; ९५० किलो गोमांस जप्त, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये एलसीबीचा कत्तलखान्यावर धडाकेबाज छापा; ९५० किलो गोमांस जप्त, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

लागोपाठ झालेल्या या चार कारवायांनंतर संगमनेर शहर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ते झोपेचे सोंग घेत आहेत की काय, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर

संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आपली मोहीम सुरूच ठेवली असून, सोमवारी झालेल्या कारवाईत तब्बल ९५० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकाच आठवड्यात एलसीबीने केलेली ही चौथी मोठी कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे. नगरहून येऊन एलसीबीचे पथक वारंवार कारवाया करत असताना, स्थानिक संगमनेर पोलीस मात्र या प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आता सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, गणेश लोंढे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डीले आणि उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. संगमनेर शहरातील गल्ली नंबर ६, जमजम कॉलनी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये नवाज जावेद कुरेशी हा आपल्या साथीदारांसह गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी गल्लीबोळातून पसार झाले, मात्र घटनास्थळाच्या पाहणीत मोठ्या प्रमाणात मांस मिळून आले.

या छाप्यात पोलिसांनी २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ९५० किलो गोमांस, चाकू, काणस आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण २ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी नवाज जावेद कुरेशी, समद जावेद आणि नावेद जावेद कुरेशी (सर्व रा. भारतनगर, संगमनेर) या फरार संशयितांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) सह प्राणी संरक्षण अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच आठवड्यात एलसीबीने संगमनेर शहरात प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत चार वेगवेगळ्या कारवाया करून आतापर्यंत एकूण २० लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एलसीबीचे पथक अहिल्यानगरहून येऊन शहरात सक्रिय असलेल्या अवैध धंद्यांचा शोध लावत असताना, स्थानिक पोलिसांना मात्र याची कुणकुण कशी लागत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लागोपाठ झालेल्या या चार कारवायांनंतर संगमनेर शहर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ते झोपेचे सोंग घेत आहेत की काय, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 363
कत्तलखाना कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.