Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले दरोडेखोर जेरबंद; संगमनेर पोलिसांनी उधळला मोठा कट, एक फरार, 1.63 लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले दरोडेखोर जेरबंद; संगमनेर पोलिसांनी उधळला मोठा कट, एक फरार, 1.63 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस कॉन्स्टेबल विजय आण्णा खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पकडलेल्या चौघा व फरार झालेल्या एका आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं. 939/2025 अन्वये बी.एन.एस. कलम 310(4), 310(5), सह शस्त्र अधिनियम 25/3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर पोलिसांना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी प्राणघातक हत्यार व साहित्यानिशी पकडण्यात मोठे यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघा सराईत गुन्हेगारांना पकडले असून एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या टोळीतील आरोपींच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी (23 ऑक्टोंबर) मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

निखील विजय वाल्हेकर (वय 24 वर्षे, रा. वेल्हाळे, संगमनेर), अनिकेत गजानन मंडलिक (वय 23 वर्षे, रा. माळीवाडा, संगमनेर), मोहन विजय खरात (वय 19 वर्षे, रा. घुलेवाडी, संगमनेर) व आदित्य संजय शिंदे (वय 19 वर्षे, रा. अकोले नाका, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून साई शरद सुर्यवंशी (रा. अकोले नाका, संगमनेर) हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पकडलेल्या सर्व आरोपींना संगमनेर न्यायालयाने सोमवारपर्यंत (27 ऑक्टोबर) पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुरुवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपनिरीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुकरे, पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे, पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे, पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे, पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार, पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे व पोलीस कॉन्स्टेबल संदीप सिताराम कोंदे यांचे पथक शहरालगतच्या घुलेवाडी शिवारातील हरीबाबा मंदिराजवळून गस्त घालत असताना त्यांना संशयास्पदरित्या काही लोक आढळून आले. 

पाच पैकी चौघांना पकडण्यात पोलिसांच्या या पथकाला यश आले तर एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पथकाच्या चौकशीत व तपासणीमध्ये हे टोळके आसपासच्या परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून दरोडा घालण्यासाठी लागणारे प्राणघातक हत्यारे अग्नि शस्त्र व इतर साहित्य जप्त केले आहे. 

यात रेडमी कंपनीचे तीन मोबाईल (निळा, फिकट निळा, जांभळा) आणि अँपल कंपनीचा एक पांढरा मोबाईल, ज्यांची अंदाजित किंमत 85,000/- आहे. 40 हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची फॅशन प्रो मोटार सायकल (क्र. एम. एच. 17 बी. जे. 8292), 35 हजार रुपये किमतीची ज्युपीटर कंपनीची ब्लु कलरची स्कुटी (क्र. एम. एच. 17 सी. एल. 7659), एक तीन हजार रुपये किमतीचे एअर पिस्टल (9 इंच लांबीचे बॅरल), 12 इंच लांबीचा एक कोयता, एक ड्रावर (9 इंच लांबीचा, 3.5 इंच लांबीची हिरवी मूठ), 20 फुट लांबीची रस्सी, लाकडी मूठ असलेला एक लोखंडी कोयता, एक हातोडा, एक 17 इंच लांबीची लोखंडी कटावणी, एक 30 इंच लांबीची लोखंडी अष्टकोणी पहार, एक 30 इंच लांबीचा लोखंडी गज, होंडा मोटार सायकलची चावी व इतर चार लोखंडी चाव्या, 100 ग्रॅम लाल रंगाची मिरचीची भुकटी या साहित्याचा समावेश आहे.

पकडलेल्या आरोपींपैकी निखिल विजय वाल्हेकर याच्यावर सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे, अनिकेत गजानन मंडलिक याच्यावर दहा गंभीर स्वरूपाचे तर फरार असलेल्या साई शरद सूर्यवंशी याच्यावर नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. पोलीस कॉन्स्टेबल विजय आण्णा खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पकडलेल्या चौघा व फरार झालेल्या एका आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं. 939/2025 अन्वये बी.एन.एस. कलम 310(4), 310(5), सह शस्त्र अधिनियम 25/3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक इमरान खान पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,624
क्राईम गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar मोहसीन शेख | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात…

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.