Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात थेट पोलीस ठाण्यात घुसून गोंधळ, पोलीस अंमलदाराला शिवीगाळ; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरात थेट पोलीस ठाण्यात घुसून गोंधळ, पोलीस अंमलदाराला शिवीगाळ; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: पोलीस ठाण्यातच बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घालणे, पोलीस अंमलदाराच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि त्यांना अश्लील शिवीगाळ करणे, या गंभीर आरोपांखाली संगमनेर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह एकूण १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश लक्ष्मण हासे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या सहा आरोपींमध्ये सागर बागे, सुरज बागे, ऋषी आव्हाड, सागर पगारे, मनोज पगारे आणि सनी धारणकर यांचा समावेश आहे. या सहा आरोपींव्यतिरिक्त अन्य ०६ अनोळखी व्यक्तींवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बुधवारी (२२ ऑक्टोबर) रात्री ८.०० वाजेपासून ते गुरुवारी (२३ ऑक्टोबर) रोजी सकाळी ८.०० वाजेपर्यंतच्या दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. फिर्यादी योगेश हासे हे त्यांच्या केबिनमध्ये शासकीय काम करत असताना, आरोपींनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून थेट पोलीस ठाणे अंमलदार यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला.

केबिनमध्ये प्रवेश केल्यानंतर आरोपींनी मोठ-मोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. फिर्यादी हासे यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांचे काहीही न ऐकता दंगा सुरूच ठेवला. या गोंधळात आरोपींनी तक्रारदार योगेश हासे यांना बसण्यासाठी असलेली खुर्ची ढकलून दिली आणि त्यांना अश्लील शिवीगाळ केली. आरोपींच्या या कृत्यांमुळे योगेश हासे यांच्या शासकीय कामात गंभीर अडथळा निर्माण झाला.

पो.हे.कॉ. योगेश लक्ष्मण हासे यांच्या तक्रारीवरून, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९४४/२०२५ अन्वये आरोपींविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या कलम २२१, ३५२, ३५१(२), १८९(१), १८९(२), १९४(२), २९६ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११२ आणि ११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,219
क्राइम गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar मोहसीन शेख | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात…

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.