Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्की परिवर्तन – ना. विखे पाटील
राजकारण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्की परिवर्तन – ना. विखे पाटील

संगमनेर तालुक्यातूनही अनेकजण इच्छुक असल्याचे सांगून 'वेळ येईल तेव्हा सर्व नावे पुढे येतील' असे सूचक विधान त्यांनी केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठे परिवर्तन होईल, भारतीय जनता पक्षात (भाजप) जिल्ह्यातून अनेकजण प्रवेश करण्यास इच्छुक असून, पक्षाची क्षमता वाढवणाऱ्या लोकांना बरोबर घेण्याचे धोरण आहे. या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाच्या विस्ताराचे काम सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

महायुतीच्या संगमनेरमधील दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, श्रीमती सुनिता भांगरे आणि अमित भांगरे यांनी भेट घेतली, यावेळी माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ‘ऑपरेशन लोटस’ निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातूनही अनेकजण इच्छुक असल्याचे सांगून ‘वेळ येईल तेव्हा सर्व नावे पुढे येतील’ असे सूचक विधान त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाजपमधील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, गडकरी ज्येष्ठ नेते असले तरी त्यांच्या मताशी मी सहमत नाही. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेला आहे. सर्वांच्या समन्वयाने राज्यात महायुतीचे सरकार येऊ शकले आणि पक्षाचा विस्तारही सर्वांचा मेळ घालूनच होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

फलटण येथील घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, या घटनेतील कोणत्याही आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही. जर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे भगिनीचा जीव गेला असेल, तर त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नेवासा येथील घटनेबाबत पोलीस उपमहासंचालक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली असून, आरोपी कोणीही असो कारवाई होणारच. संघाच्या कार्यकर्त्यांशी संबंध जोडून कोणी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्यास तो शक्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस चौकशी करून दोन-तीन दिवसांत अहवाल सादर करतील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 506
राधाकृष्ण विखे पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.