Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपालिकेच्या मतदार यादीवर ‘हरकतींचे वादळ’: उद्या प्रांताधिकारी कार्यालयात निर्णायक सुनावणी!
निवडणूक

संगमनेर नगरपालिकेच्या मतदार यादीवर ‘हरकतींचे वादळ’: उद्या प्रांताधिकारी कार्यालयात निर्णायक सुनावणी!

त्यामुळे आता केवळ सुमारे एक हजार (१०००) हरकतींवरच मंगळवारी (दि. २८) प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार याद्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. १५ प्रभागांतील मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत तब्बल १७३० हरकती (आक्षेप) दाखल झाल्या असून, यावर मंगळवारी (दि. २८) प्रांताधिकारी कार्यालयात निर्णायक सुनावणी होणार आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या याद्यांमध्ये अनेक प्रभागांतील मतदारांची नावे चुकीने दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे उघड झाले. यामुळे, आपले नाव योग्य प्रभागात समाविष्ट करून घेण्यासाठी स्वतः मतदारांनी आणि इच्छुक नगरसेवकांनी/कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हरकती नोंदवल्या. 

पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा प्रभागांत एकूण १७३० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. दाखल झालेल्या हरकती ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन स्वरूपाच्या आहेत.

* ‘अ’ वर्ग: यामध्ये मतदारांनी स्वतः आपली नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याबद्दल किंवा समाविष्ट करण्याबद्दल हरकती नोंदवल्या आहेत.

* ‘ब’ वर्ग: यामध्ये इच्छुक नगरसेवक आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी इतर मतदारांच्या नावांवर हरकती घेतल्या आहेत. या हरकती घेण्यामागे स्वतःच्या हक्काची मते (मतपेटी) सुरक्षित करण्याचा प्रयत्न असल्यामुळे काही मतदार नाराज झाले आहेत.

प्रांताधिकारी कार्यालयाकडे दाखल झालेल्या एकूण १७३० हरकतींपैकी, ‘अ’ वर्गातील २०० मतदारांच्या हरकती यापूर्वीच निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच, इतरही काही हरकतींवर निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ सुमारे एक हजार (१०००) हरकतींवरच मंगळवारी (दि. २८) प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

यावेळी स्वतः मतदार, त्यांचे प्रतिनिधी, हरकत घेणारे इच्छुक नगरसेवक आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित राहून आपले म्हणणे मांडतील. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हरकती नोंदवलेल्या मतदारांच्या प्रभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला आहे आणि संबंधित मतदारांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.

या संपूर्ण प्रक्रियेत, मतदारांच्या नावावर हरकती घेतल्या असल्या तरी कुठल्या प्रभागात नाव समाविष्ट करायचे याचा अंतिम अधिकार मतदाराला असतो, यावर प्रांताधिकारी निर्णय देतील. या सुनावणीनंतर लगेचच मतदार यादीवर अंतिम निर्णय होऊन ती प्रसिद्ध केली जाणार आहे, ज्यामुळे निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेला गती मिळेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 776
निवडणूक हरकती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.