Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकरांचा संयम संपला! नगरपरिषदेवर धडक मोर्चा; ‘आठ दिवसांत काम करा, नाहीतर चक्का जाम!’ अस्वच्छता, पाणी, खड्डे… संगमनेर शहर समस्यांच्या विळख्यात; नागरिकांचे पालिका प्रशासनाला निर्वाणीचे अल्टिमेटम
आंदोलन

संगमनेरकरांचा संयम संपला! नगरपरिषदेवर धडक मोर्चा; ‘आठ दिवसांत काम करा, नाहीतर चक्का जाम!’ अस्वच्छता, पाणी, खड्डे… संगमनेर शहर समस्यांच्या विळख्यात; नागरिकांचे पालिका प्रशासनाला निर्वाणीचे अल्टिमेटम

मागील सहा महिन्यांपासून शहरात अनाधिकृत राजकीय फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लागलेले असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे, हे सर्व फ्लेक्स तातडीने काढले जावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: एकेकाळी ‘सुरक्षित, सुसंस्कृत आणि वैभवशाली’ अशी ओळख असलेल्या संगमनेर शहरात सध्या प्रशासकीय पातळीवर वाढलेली अस्वच्छता, अनियमित पाणी-वीज पुरवठा, अवैध फ्लेक्सबाजी आणि मोकाट जनावरांच्या त्रासाला नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत. या गंभीर समस्यांकडे नगर परिषदेचे होत असलेले दुर्लक्ष पाहून संगमनेरकरांनी आज सोमवारी नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढून ‘हल्लाबोल’ केला. येत्या आठ दिवसांत या समस्यांवर प्रभावी उपाययोजना न झाल्यास शहरवासीय भव्य ‘चक्का जाम’ आंदोलन करतील, असा आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला आहे.

माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सोमेश्वर दिवटे, गजेंद्र अभंग, शैलेश कलंत्री, डॉ. दानिश रईस खान, शुभम परदेशी, बादल जेधे, सिद्राम दिड्डी, निखिल पापडेजा, हैदरअली सय्यद, संदीप लोहे, बाजीराव शेरमाळे, नाना वाघ, सतीश आहेर, ॲड. प्रकाश कडलग, किरण पाटणकर, मंगला बाळसराफ, सलीम रंगरेज, वैशाली आडेप, अफजल शेख, अभय खोजे, नूर मोहम्मद शेख, अंबादास आडेप, सुभाष दिघे, एकनाथ श्रीपाद, सचिन खाडे, गोपी जहागीरदार, अलोक बर्डे, प्रमोद गणोरे, जावेद शेख, प्रवीण दीड्डी, बाळासाहेब पवार, निरंजन सातपुते, कमलेश सोनवणे, तुषार पवार, विशाल सस्कर, नदीम कुरेशी, मुजीब खान, बालम पठाण, मुन्ना शेख, प्रमिला अभंग, वैशाली बर्गे, सुरेश झावरे, संतोष सातपुते, सिकंदर शेख, संतोष मुर्तडक, तुकाराम शिरोळे, नितीन अभंग, ईश्वर फापाळे ,सुनील सस्कर, गीता सस्कर, विजय पवार, सुनिता कांदळकर आदींसह प्रमुख नागरिकांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी धनश्री पवार यांना निवेदन दिले. 

निवेदनात नागरिकांनी अनेक गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. यामध्ये लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन कार्यान्वित झाली असली तरी शहरात सध्या अपूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तो त्वरित सुरळीत करण्याची मागणी आहे. तसेच, ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर’ ही ओळख पुसली जात असून शहरात मोठी अस्वच्छता वाढली आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, कचरा वेळेवर उचलला जात नाही, यामुळे डास व आजारांचे प्रमाण वाढले आहे. याव्यतिरिक्त, स्ट्रीट लाईट वेळेवर सुरू होत नाहीत, तसेच विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या लोंबकळल्याने धोका वाढला आहे. 

शहरात मोकाट गाई, कुत्रे, डुकरे यांचा मोठा उपद्रव वाढला असून, त्यांच्या बंदोबस्ताची तातडीने मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक सुलभ शौचालय व युरिनलची नियमित स्वच्छता होत नाही आणि तिथे नळ जोडणी नाही, अशी दुरवस्था आहे. शहरातील अनेक रस्त्यांची खड्डेमय अवस्था झाली असून ते त्वरित बुजवावेत, तसेच साईड पट्ट्यांवरील माती उचलून रस्ते स्वच्छ ठेवावेत. सोबतच, मागील सहा महिन्यांपासून शहरात अनाधिकृत राजकीय फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लागलेले असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे, हे सर्व फ्लेक्स तातडीने काढले जावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

आंदोलनादरम्यान नागरिकांनी नगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर मुख्याधिकारी धनश्री पवार व विविध विभाग प्रमुखांनी निवेदन स्वीकारत, सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नागरिकांनी हे आश्वासन पुरेसे न मानता, येत्या आठ दिवसांत समस्या सुटल्या नाहीत, तर शहरातील नागरिक एकत्र येऊन भव्य ‘चक्का जाम’ आंदोलन करतील, असा आक्रमक इशारा दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,549
आंदोलन दुर्गाताई तांबे नागरी समस्या मोर्चा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.