Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सोनांबेकर रुग्णालयातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेना शहरप्रमुख अमित चव्हाण यांची आक्रमक मागणी
आंदोलन

सोनांबेकर रुग्णालयातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेना शहरप्रमुख अमित चव्हाण यांची आक्रमक मागणी

डॉक्टरांच्या संघटनेने आपल्या सहकारी बांधवांच्या चुकीच्या कृत्याचे समर्थन करणे थांबवावे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
शहरातील सोनांबेकर रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत, संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अमित चव्हाण यांनी केली आहे. वैद्यकीय क्षेत्राला कलंकित करणाऱ्या अशा घटनांमुळे सामान्य जनतेचा डॉक्टरांवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी या रुग्णास उपचारासाठी सोनांबेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि नाशिक येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संगमनेरच्या सोनांबेकर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच दळवी यांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने नातेवाईकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर डॉ. अभिजीत कोरडे आणि डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत न्यायालयाचा आदेश असूनही गुन्हा नोंदवण्यास आठ दिवसांचा विलंब झाल्याने पोलीस यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अमित चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाने या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास करावा आणि दोषी डॉक्टरांवर कठोर कलमान्वये कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दुसरीकडे, डॉक्टरांच्या संघटनेने आरोपी डॉक्टरांच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माध्यमांनी ही घटना उजेडात आणल्यानंतर संघटनेने ‘मीडिया ट्रायल’ होत असल्याचा दावा करत प्रशासनाला निवेदन दिले आहे. यावर आक्षेप घेताना चव्हाण म्हणाले की, डॉक्टरांच्या संघटनेने आपल्या सहकारी बांधवांच्या चुकीच्या कृत्याचे समर्थन करणे थांबवावे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि आरोपींना तात्काळ अटक होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 637
अमित चव्हाण शिवसेना उद्धव ठाकरे सोनांबेकर हॉस्पीटल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.