Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भंडारदरा धरण क्षेत्रातील आदिवासी गावांच्या पाणी प्रश्नासाठी सर्वेक्षणास प्रारंभ; किसान सभेच्या लढ्याला ऐतिहासिक यश
आंदोलन

भंडारदरा धरण क्षेत्रातील आदिवासी गावांच्या पाणी प्रश्नासाठी सर्वेक्षणास प्रारंभ; किसान सभेच्या लढ्याला ऐतिहासिक यश

बैठकीत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, गणेश ताजने, तुळशीराम कातोरे, हेमलता शेळके आणि संगीता साळवे यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले

भंडारदरा धरणाच्या मागील बाजूकडील सर्व आदिवासी गावे आणि धरण भिंतीच्या पूर्व भागातील परिसराला शासकीय योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणास अखेर सुरुवात झाली आहे.

किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या लाँग मार्चमधील मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी अकोले तहसील कार्यालयात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा व सीटूच्या विविध संघटनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग नोंदवला, तर प्रांताधिकारी अरुण उंडे आणि तहसीलदार मोरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

बैठकीत कोळेकर यांनी माहिती दिली की, लाँग मार्चमध्ये मान्य झालेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वेक्षणाचे आदेश निर्गमित केले आहेत. जलसंपदा विभागाला याबाबतचे अधिकृत आदेश प्राप्त झाले असून, प्राथमिक सर्वेक्षणाचे काम येत्या आठवड्याभरात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पाणी प्रश्नासोबतच धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दाही या बैठकीत केंद्रस्थानी राहिला. भंडारदरा धरणासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला म्हणून मिळालेल्या जमिनी ‘वर्ग दोन’ ऐवजी ‘वर्ग एक’ मध्ये रूपांतरित करून त्यांना जमिनीचे पूर्ण मालकी हक्क देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

तसेच, अकोले तालुक्यातील घरांच्या तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी किसान सभेने दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, नवीन शासनादेशानुसार २०११ पूर्वीची अशी सर्व प्रकरणे निकाली काढून जमिनी संबंधितांच्या नावे करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कसत असलेल्या वन जमिनींच्या हक्काबाबतही बैठकीत महत्त्वपूर्ण प्रगती झाली. लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर किसान सभेने सादर केलेल्या ९४८ प्रकरणांची प्रत्यक्ष पडताळणी तातडीने सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच आशा कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक आणि बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन ते सोडवण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घेण्यात आले. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत रतनवाडी आणि खडकी बुद्रुक येथे झालेल्या कामांमधील तक्रारींवरून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, तसेच आंबेवंगण येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी देण्याची मागणी आग्रहाने मांडण्यात आली.

या निर्णयामुळे भंडारदरा धरणाला १०० वर्षे पूर्ण होत असताना, हक्काच्या पाण्यापासून वंचित असलेल्या स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना शेती आणि पिण्याचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, याकडे किसान सभेच्या सातत्यपूर्ण लढ्याचे मोठे यश म्हणून पाहिले जात आहे.

या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, गणेश ताजने, तुळशीराम कातोरे, हेमलता शेळके आणि संगीता साळवे यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 542
अजित नवले किसान सभा भंडारदरा धरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar29/08/20260

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात…

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.