Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरातील ‘बेघर’ आता होणार ‘घरमालक’! आमदार सत्यजित तांबेंच्या प्रयत्नांमुळे गृहनिर्माण प्रकल्पाला वेग; दोन वर्षांत घर देण्याचा निर्धार! उपविभागीय कार्यालयात बैठक
बैठक

संगमनेरातील ‘बेघर’ आता होणार ‘घरमालक’! आमदार सत्यजित तांबेंच्या प्रयत्नांमुळे गृहनिर्माण प्रकल्पाला वेग; दोन वर्षांत घर देण्याचा निर्धार! उपविभागीय कार्यालयात बैठक

जमिनी जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून गृहयोजनेसाठी मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सुमारे तीन एकर जागेवर बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेरमधील कष्टकरी आणि बेघर कुटुंबांना आता स्वतःचे हक्काचे घर मिळण्याच्या प्रशासकीय कामांना मोठा वेग आला आहे. आज (सोमवारी, २७ ऑक्टोबर) आमदार तांबे यांनी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन या गृहनिर्माण प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. बेघरांना त्वरित घर देण्यासाठी शासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती या बैठकीत मिळाली आहे.

बैठकीसाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, संगमनेर नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्यासह महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन साळुंखे आणि मोठ्या संख्येने गरजू महिला उपस्थित होत्या.

प्रशासकीय पातळीवर सर्व संबंधित प्रलंबित कामांची माहिती घेऊन ती त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश आमदार तांबे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे संगमनेरच्या बेघर कष्टकरी वर्गात आनंदाचे आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन वर्षांत घर देण्याचा तांबेंचा निर्धार – बैठकीत आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान आवास योजना, बांधकाम कामगार योजना आणि राज्य सरकारच्या विविध गृह योजनांच्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलेला घर मिळवून देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना घर नाही, जे भाड्याच्या घरात राहतात त्या सर्वांना पुढील दोन वर्षांत संगमनेरमध्ये हक्काचे घर मिळवून देऊ, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पासाठी गुंजाळवाडी, घुलेवाडी आणि सुकेवाडी परिसरातील सरकारी जमिनींचे तातडीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या जमिनींवर सोसायटीच्या माध्यमातून गृहकुल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमानुसार, प्रत्येक महिलेला सोसायटीची सभासदता मिळणार असून घरांचे वाटप पारदर्शकपणे लॉटरी पद्धतीने केले जाणार आहे.

तीन एकर जागेवर बहुमजली प्रकल्पाची योजना – आमदार तांबे यांनी यावेळी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. ते म्हणाले, शहरात प्लॉट उरले नाहीत पण आजूबाजूच्या गावांमध्ये सरकारी जमिनी उपलब्ध आहेत. त्या जमिनी जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून गृहयोजनेसाठी मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सुमारे तीन एकर जागेवर बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ निवासाचा प्रकल्प नसेल, तर महिलांसाठी सुरक्षित निवास, मुलांसाठी खेळाचे गार्डन, अंगणवाडी आणि स्वच्छतेच्या आधुनिक सुविधांनी युक्त असा हा संपूर्ण गृहसंकुल असणार आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,056
बेघर कुटुंबांना घर बैठक सचिन साळुंके सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यांसाठी ‘आचारसंहिता’ लागू; रात्री १० नंतर डीजे बंद

06/08/2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar नेवासा / श्रीगोंदा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व बंदी असलेल्या गुटखा-तंबाखूच्या विक्रीवर स्थानिक…

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.