Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात कत्तलखान्यावर छापा तीन लाख रुपयांचे गोमांस पोलिसांनी घेतले ताब्यात
गुन्हेगारी

संगमनेरात कत्तलखान्यावर छापा तीन लाख रुपयांचे गोमांस पोलिसांनी घेतले ताब्यात

या कारवाईमध्ये गोवंश जातीचे कत्तल केलेले सुमारे तीन लाख रुपये किमतीचे अंदाजे १५०० किलो गोमांस जप्त केले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 28, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर शहर पोलिसांच्या नाकासमोर सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या वेळी छापेमारी केली आहे. शहरातील मदिना नगरमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत तीन लाख रुपये किमतीचे तब्बल दीड हजार किलो गोमांस पोलिसांनी हस्तगत केले आहे.

संगमनेर मधील कत्तलखाने बंद असल्याचे भासविले जात असले तरी ते सुरूच आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मंगळवारी पहाटे ०३.१० वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की, संगमनेर शहरातील मदिनानगर या ठिकाणी सालीम साटम कुरेशी आणि गुलाम फरीद साबिर कुरेशी (दोघे रा. बुध्दविहार शेजारी, संगमनेर) हे पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश कत्तल करत आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांनी आपल्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल रघुनाथ कडलग, पोलीस नाईक पांडुरंग विष्णु पटेकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांना कारवाईचे आदेश देत खात्री करण्यासाठी पाठवले. पथकाने संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या स्टाफला मदतीसाठी सोबत घेऊन ०३.५० वाजता नमूद ठिकाणी छापा टाकला.

दरम्यान पोलिसांची चाहुल लागताच घटनास्थळी उपस्थित असलेले दोन इसम पळून गेले. पळून गेलेले इसम हे सालीम साटम कुरेशी आणि गुलाम फरीद साबीर कुरेशी असल्याची खात्री झाली. या कारवाईमध्ये गोवंश जातीचे कत्तल केलेले सुमारे तीन लाख रुपये किमतीचे अंदाजे १५०० किलो गोमांस जप्त केले.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९५७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३ (५) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ सुधारीत २०१५ चे कलम ५, ५ (क), ९, ९ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,116
गोवंश कत्तल पोलीस कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

June 11, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 13, 20260

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी हा…

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.