Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

ठाकरे गटाच्या ६ गद्दार खासदारांचे दिल्लीत लोटांगण; अखेर शिंदेशाहीत विलीन होणार! गद्दारांच्या यादीत शिर्डीचे खासदार!

June 17, 2026

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा (MACCIA) निवडणूक निकाल जाहीर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड, पाहा राज्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी!

June 17, 2026

पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल, चॉपर आणि जिवंत काडतुसांसह दोघांना अटक, मुख्य सूत्रधार फरार

June 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘ऑपरेशन क्लीन’ची गरज! अमली पदार्थांच्या तस्करीने संगमनेरकर अस्वस्थ; लोकनेते बाळासाहेब थोरात यांची चिंता खरी! अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीने शांतता भंग
महाराष्ट्र संवाद विशेष

‘ऑपरेशन क्लीन’ची गरज! अमली पदार्थांच्या तस्करीने संगमनेरकर अस्वस्थ; लोकनेते बाळासाहेब थोरात यांची चिंता खरी! अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीने शांतता भंग

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या परिस्थितीबद्दल यापूर्वीच तीव्र चिंता व्यक्त केली होती, आणि आता अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठी कारवाई झाल्याने त्यांची चिंता खरी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 29, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – शांत, सुसंस्कृत आणि वैभवशाली ओळख असलेल्या संगमनेर शहरात मागील एका वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आणि अस्वस्थता वाढली आहे. त्यातच, दादागिरी, दहशत आणि अमली पदार्थांची तस्करी या गंभीर विषयांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. राज्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि यांनी या परिस्थितीबद्दल यापूर्वीच तीव्र चिंता व्यक्त केली होती, आणि आता अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठी कारवाई झाल्याने त्यांची चिंता खरी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना लोकनेते थोरात यांनी संगमनेर तालुक्याला परिवार म्हणून जपल्याचे आणि सातत्याने विकास योजना राबवल्याचे सांगितले होते. शिक्षण, सहकार, ग्रामीण विकास आणि शेतीमधून तालुक्याला फुलवले. मात्र, सध्या संगमनेरमध्ये असलेले चिंतेचे वातावरण त्यांनी अधोरेखित केले. थोरात म्हणाले होते, ड्रग्स (अमली पदार्थ) हा विषय अत्यंत अवघड असून संगमनेरमध्ये या विषयाने प्रवेश केला आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

थोरात यांनी तरुण पिढीच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करत, त्यांच्या हाती काम देण्याऐवजी जातिवाद वाढवून राजकारण करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. अमली पदार्थांच्या सेवनाने तरुणाईचे भविष्य अंधकारमय होणार असल्याने त्यांनी पालक आणि तरुणांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. पत्रकारांनी या गंभीर विषयावर आवाज उठवावा आणि नागरिकांनी सजग राहावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.

दरम्यान थोरात यांनी व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये अमली पदार्थांची तस्करी करताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गंभीर प्रकरणामागे सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे, यामुळे या अवैध धंद्यांना राजकीय दबावातून चालना मिळत असल्याची शंका बळावली आहे. शांत संगमनेर शहराची घडी विस्कटल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. या प्रकारांमुळे शहरातील शांतता आणि सुसंस्कृतता धोक्यात आली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 733
अमली पदार्थ बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाची सांगता; निसर्गाचे जतन व संवर्धनाचा संदेश… निसर्ग जपणे हीच गगनगिरी महाराज व ईश्वराची खरी सेवा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 15, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

ठाकरे गटाच्या ६ गद्दार खासदारांचे दिल्लीत लोटांगण; अखेर शिंदेशाहीत विलीन होणार! गद्दारांच्या यादीत शिर्डीचे खासदार!

By अनंत पांगारकरJune 17, 20260

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि निष्ठावंत शिवसैनिकांशी गद्दारी करणाऱ्या ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी अखेर दिल्लीत लोटांगण…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा (MACCIA) निवडणूक निकाल जाहीर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड, पाहा राज्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी!

June 17, 2026

पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल, चॉपर आणि जिवंत काडतुसांसह दोघांना अटक, मुख्य सूत्रधार फरार

June 17, 2026

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली… सरकारला थेट इशारा

June 17, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.