Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘माणुसकी जिंकली!’ राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) धावले मदतीला; जळालेल्या सायकलऐवजी नवी सायकल देऊन दळे कुटुंबाला मोठा आधार! माणुसकीच्या दर्शनाने कुटुंबाचे डोळे पाणावले!
सामाजिक

‘माणुसकी जिंकली!’ राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) धावले मदतीला; जळालेल्या सायकलऐवजी नवी सायकल देऊन दळे कुटुंबाला मोठा आधार! माणुसकीच्या दर्शनाने कुटुंबाचे डोळे पाणावले!

दळे यांचा मुलगा रायते येथून संगमनेर शहरातील सह्याद्री शाळेत शिकण्यासाठी सायकलवर येत असल्याची व या प्रकारामुळे त्याची मोठी गैरसोय झाल्याची बाब लक्षात येताच, RGSS च्या सदस्यांनी लगेचच त्या कुटुंबाशी संपर्क साधला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – गेल्या आठवड्यात (२४ ऑक्टोंबर) रोजी संगमनेर तालुक्यातील रायते गावातील दळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले. त्यांच्या दोन मोटरसायकल आणि शाळेत जाणाऱ्या मुलाची एक सायकल अज्ञाताने जाळून टाकली. वाहनांचे झालेले मोठे नुकसान आणि मुलाच्या सायकलमुळे शाळेत जाण्यासाठी होणारी गैरसोय यामुळे दळे कुटुंब दुःखाच्या गर्तेत होते. या कुटुंबाच्या विशेषत: शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या मदतीला राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) धावला. क्रॉस व्हील सायकलचे संचालक राहुल वर्पे यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर RGSS ला सायकल उपलब्ध करून देत ही सायकल विद्यार्थ्याला भेट देण्यात आली.

गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा अद्याप तपास लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी या कुटुंबाची धावती भेट घेतली खरी, पण दुर्दैवाने त्यांना कोणीही कोणतीही ठोस मदत मिळवून दिली नाही, यामुळे कुटुंबाची निराशा वाढली होती.

मदतीसाठी धावले ‘राहुल गांधी समर्थक संघ’ (RGSS) – दळे कुटुंबाच्या या संकटाची माहिती राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) संगमनेर यांच्या टीमला मिळाली. दळे यांचा मुलगा रायते येथून संगमनेर शहरातील सह्याद्री शाळेत शिकण्यासाठी सायकलवर येत असल्याची व या प्रकारामुळे त्याची मोठी गैरसोय झाल्याची बाब लक्षात येताच, RGSS च्या सदस्यांनी लगेचच त्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. बुधवारी (दिनांक २९ ऑक्टोंबर) सायंकाळी RGSS च्या टीमने दळे कुटुंबाला एक नवीन सायकल भेट म्हणून दिली. ही सायकल खास करून त्यांच्या मुलाला शाळेत जाण्यासाठी देण्यात आली आहे.

आनंदाश्रू आणि कृतज्ञता – RGSS च्या सदस्यांकडून मिळालेली ही अनपेक्षित मदत पाहून दळे कुटुंबाचे डोळे पाणावले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले आणि समाजात खरोखर अजूनही माणुसकी जिवंत आहे, या भावनेने त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला. दळे परिवाराने राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) च्या संपूर्ण ग्रुपचे मनापासून कौतुक केले आणि आभार मानले.

हे कार्य करणारे हात – RGSS संगमनेरचे हे सामाजिक कार्य यशस्वी करण्यासाठी अमोल शेलकर, शिवश्री राम अरगडे, प्रकाश कडलग, सतीश खताळ, मोहसीन रशीद शेख, सुभाष महाराज कोकणे, मोहसीन खलील शेख, अक्षय मोहिते, शंतनू भालेकर, रवींद्र हासे, अनिल राऊत, भरत कळसकर, अरुण गावित्रे आदींनी सहकार्य केले. RGSS ने केलेल्या या मानवतावादी कार्यामुळे दळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे आणि समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 953
अमोल शेलकर राहुल गांधी समर्थक संघ सायकल भेट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मजबुरी का नाम मोदी, मजबुती का नाम महात्मा गांधी!

02/10/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

SIR च्या नोटिसा आल्यात, घाबरू नका; दक्ष रहा!नोटीस मिळालेल्या नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करून कॅम्पला उपस्थित राहावे — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.