Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या ‘स्थानिक’ लढाईसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख कोते पाटलांचा शिवसैनिकांना कानमंत्र: नव्या जोमाने मैदानात उतरा! स्वबळावर किंवा मविआ म्हणून लढू, नगराध्यक्ष आमचाच!
बैठक

संगमनेरच्या ‘स्थानिक’ लढाईसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख कोते पाटलांचा शिवसैनिकांना कानमंत्र: नव्या जोमाने मैदानात उतरा! स्वबळावर किंवा मविआ म्हणून लढू, नगराध्यक्ष आमचाच!

पक्षश्रेष्ठींचा आदेश झाल्यास एकदिलाने महाविकास आघाडी म्हणून लढण्यासही शिवसैनिक सज्ज असल्याचे कतारी यांनी नमूद केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांतर्गत झालेल्या संघटनात्मक फेरबदलांनंतर संगमनेर तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान, नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी शिवसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी नव्या जोमाने आणि संपूर्ण ताकदीनिशी कामाला लागण्याचे निर्देश दिले.

बुधवारी (२९ ऑक्टोबर) संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलताना जिल्हाप्रमुख कोते पाटील यांनी स्पष्ट केले की, शिवसैनिकांनी संपूर्ण तयारीने निवडणुकांसाठी सज्ज राहावे, आणि यावेळी पक्षाकडून संबंधित उमेदवारांना पूर्ण ताकद मिळवून देण्याचे वचन त्यांनी शिवसैनिकांना दिले. 

संगमनेर तालुक्यात सध्या शिंदे गटाचे आमदार असल्याने, आगामी निवडणुका वर्चस्वाच्या आणि अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची आमची मानसिक तयारी असून, वेळ आल्यास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारीही आम्ही केली असल्याचे कोते पाटील यांनी उपस्थित शिवसैनिकांना सांगितले.

निष्ठावान शिवसैनिकांना संधी द्या – अमर कतारी

या बैठकीदरम्यान, तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी पक्षाला नख लावणाऱ्यांना त्यांची खरी जागा दाखवून देण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे सांगितले. साम, दाम, दंड, भेद नीती वापरून शिवसैनिक आपले काम पूर्ण करतील. तसेच, निष्ठावान शिवसैनिकांना संधी देण्याबाबतचा आग्रह त्यांनी जिल्हाप्रमुख व उपस्थित पदाधिकाऱ्यांकडे केला. पक्षश्रेष्ठींचा आदेश झाल्यास एकदिलाने महाविकास आघाडी म्हणून लढण्यासही शिवसैनिक सज्ज असल्याचे कतारी यांनी नमूद केले.

यावेळी सह संपर्कप्रमुख ॲड. दिलीप साळगट यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शहरप्रमुख आसिफ तांबोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीस प्रभारी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहरप्रमुख पप्पू कानकाटे, शहरप्रमुख वैभव अभंग, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, महिला शहर प्रमुख संगीता गायकवाड, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, आशा केदारी, वैशाली वडतले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय सातपुते, सदाशिव हासे, तालुका संघटक बाळासाहेब कवडे, राजू सातपुते, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्तियाज शेख, उपतालुकाप्रमुख अशोक बडे, प्रभाकर गेठे, भीमा पावसे, अमोल डुकरे, अक्षय गाडे, योगेश बिचकर, युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, शोएब शेख, प्रकाश गायकवाड, सचिन साळवे, अभि साबळे, मुस्लिम मावळा अजीज मोमीन, प्रकाश चोथवे, रहीम बेग, कैफ शेख, बाळू घोडके, योगेश बिचकर, दीपक साळुंके, संतोष कुटे, इरफान शेख, दानिश खान, रवी गिरी, ब्रह्मा खिडके यांच्यासह अनेक शिवसैनिक व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 851
आढावा बैठक बैठक शिवसेना उद्धव ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.