Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘जा SP, DYSP कडे तक्रार कर’! कर्तव्यावरील मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची तक्रारदाराला अरेरावी; संगमनेरात ‘कायदा’ संपुष्टात?
गुन्हेगारी

‘जा SP, DYSP कडे तक्रार कर’! कर्तव्यावरील मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची तक्रारदाराला अरेरावी; संगमनेरात ‘कायदा’ संपुष्टात?

पोलीस निरीक्षकांना रोजच्या तक्रारींची माहिती असूनही लेखी तक्रारीच्या अभावामुळे कारवाई न होणे, तसेच सात महिने गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्याच्या वर्तनात बदल न होणे, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2025Updated:02/11/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘कायदा आणि सुव्यवस्था’ संपुष्टात येऊन गुन्हेगारांचे राज्य आले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, संगमनेरला अमली पदार्थाचा विळखा घट्ट होत असतानाच आता खुद्द पोलीस ठाण्याची सूत्रेच ‘मद्यधुंद’ कर्मचाऱ्यांच्या हाती असल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत असलेल्या एका हवालदाराने तक्रारदाराशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित कर्मचारी हा यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला असून यामुळे नागरिक आणि पोलीस दलाच्या प्रतिमेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठांनीही हात टेकल्याने संगमनेरकरांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
जनतेचे सेवक की मालक? – संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील ‘ऑफिस क्राईम’ विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सोनवणे हे शनिवारी (दि. ०१ नोव्हेंबर) सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान कर्तव्यावर (ऑन ड्युटी) असताना, मद्यधुंद अवस्थेत होते. याचवेळी, हरवलेल्या पासपोर्टची तक्रार घेऊन आलेल्या एका नागरिकाला हवालदार सोनवणे यांनी अत्यंत असंवेदनशील आणि गैरवर्तन करणारी उत्तरे दिल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तक्रार अर्जावर चर्चा करत असताना हवालदार सोनवणे यांनी अत्यंत गैरप्रकारे संभाषण केले. या संभाषणाचा व्हिडिओ उपलब्ध असून, तो प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहे.
समाज माध्यमातील हा व्हिडिओ महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वाचकांसाठी देखील उपलब्ध करून देत आहोत –
https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2025/11/VID-20251102-WA0005.mp4
पोलीस निरीक्षकांनीही व्यक्त केला वैताग; वरिष्ठांना तक्रार करा! – या गंभीर गैरवर्तनाची तक्रार देण्यासाठी संबंधित व्यक्ती थेट संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे गेले असता, पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेली माहिती अधिक चिंताजनक आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी स्पष्ट केले की, आम्ही स्वतः या हवालदाराला वैतागलो आहोत. रोज कुणाची न कुणाची याच्या विरोधात शाब्दिक तक्रार होत असते, मात्र कोणी लेखी तक्रार देत नाही. आम्ही तक्रार घेतली तरी हेच हवालदार आमच्या विरोधात तक्रारी करतात.
देशमुख यांनी हेही उघड केले की, हवालदार सोनवणे हे मागील सात महिन्यांपासून गैरहजर होते आणि आता ड्युटीवर परतल्यानंतरही त्यांच्या वागण्यात कोणताही बदल झालेला नाही. त्यांनी तक्रारदाराला स्वतःहून वरिष्ठांना याची तक्रार करण्याचे आणि त्यांनाही लेखी म्हणणे देण्याचे आवाहन केले, जेणेकरून ते वरिष्ठांना कळवू शकतील.
एसपीला तक्रार कर, तुला काय करायचं ते कर, नियमांचे गंभीर उल्लंघन – पोलीस हवालदार सोनवणे यांनी ऑन ड्युटी असताना दारूच्या नशेत असणे, तक्रारदाराशी गैरवर्तन करणे, आणि अत्यंत उद्धटपणे तक्रारदाराला एसपीला तक्रार कर माझी किंवा डीवायएसपीला कर, तुला काय करायचं ते कर असे म्हणणे हे सेवा नियमांचे आणि कायदेशीर शिस्तीचे गंभीर उल्लंघन आहे. पोलीस निरीक्षकांना रोजच्या तक्रारींची माहिती असूनही लेखी तक्रारीच्या अभावामुळे कारवाई न होणे, तसेच सात महिने गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्याच्या वर्तनात बदल न होणे, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्रशासकीय भूमिकेकडे संगमनेरकरांचे लक्ष – ‘ऑफिस क्राईम’सारख्या महत्त्वाच्या विभागात असे कर्मचारी कार्यरत असल्यास, सामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल कशी घेतली जाईल आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण कसे मिळवले जाईल, हा मोठा प्रश्न आहे.
तक्रारदाराने केलेल्या व्हिडिओच्या आधारावर, पोलीस प्राधिकरण, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक, आणि अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, हवालदार ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी आणि पोलीस दलाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर संदेश द्यावा, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक स्तरावरून जोर धरू लागली आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,769
संगमनेर शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.