Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसीबीचा ‘मेगा’ ॲक्शन प्लॅन: ४६.५० लाखांची लाच घेणारा P.S.I. रंगेहात पकडला! उपनिरीक्षक २ कोटींची लाच मागत होता; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभागही तपासणार
गुन्हेगारी

एसीबीचा ‘मेगा’ ॲक्शन प्लॅन: ४६.५० लाखांची लाच घेणारा P.S.I. रंगेहात पकडला! उपनिरीक्षक २ कोटींची लाच मागत होता; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभागही तपासणार

एसीबीकडून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या लाचखोरीमध्ये कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग आहे का, याचाही कसून शोध घेतला जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/11/2025Updated:03/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे – पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत मोठी धडक कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (वय ३५) याला तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

एसीबीच्या माहितीनुसार, आरोपी उपनिरीक्षकाने तक्रारदाराच्या आशिलाला गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्यासाठी आणि त्याच्या वडिलांचा जामीन मिळवून देण्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणात तक्रारदाराचे वडील एका गुन्ह्यात अटकेत होते आणि प्रमोद चिंतामणी या प्रकरणाचा तपास अधिकारी होता. त्याने या लाचेच्या रकमेतील १ कोटी रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित १ कोटी रुपये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देणार असल्याचे त्याने प्राथमिक पडताळणीमध्ये (२७ ऑक्टोबर) स्पष्ट झाले होते.

तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर विभागाने सापळा रचला. रविवारी (२ नोव्हेंबर) तक्रारदाराकडून ठरलेल्या ५० लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्यातील ४६.५० लाखांची रोख रक्कम स्वीकारताना चिंतामणीला पुणे शहरातील पेठ रस्त्यावरील उंटाड्या मारुती मंदिरासमोर रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी पुणे शहरातील समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचेची रक्कम जप्त करतानाच, एसीबीने आरोपी उपनिरीक्षकाची कसून झडती घेतली. या झडतीमध्ये ४५ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम, सॅमसंग फोल्ड आणि ॲपल आयफोन असे दोन महागडे मोबाईल फोन, तसेच ३६०० रुपये अतिरिक्त रोख आणि शासकीय ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. एसीबीकडून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या लाचखोरीमध्ये कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग आहे का, याचाही कसून शोध घेतला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 728
पीएसआय लाचखोरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या पडलेल्या प्रदीर्घ…

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.