Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेतकऱ्यांच्या नावे ट्रॅक्टर घेऊन गंडा घालणारी टोळी जेरबंद! ९ ट्रॅक्टरसह ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; पोलिसांची धडाकेबाज कारवाई
गुन्हेगारी

शेतकऱ्यांच्या नावे ट्रॅक्टर घेऊन गंडा घालणारी टोळी जेरबंद! ९ ट्रॅक्टरसह ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सदर गुन्ह्याचा पुढील तपास राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे हे करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/11/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी करायचे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना गंडा घालून ते ट्रॅक्टर परस्पर विक्री करणाऱ्या दोघांना श्रीरामपूर पोलिसांच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने जेरबंद केले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

या कारवाईत पोलिसांनी भालचंद्र अशोक साळवी (रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व अभिजीत सुनील भांडवलकर (रा. सिव्हिल हडको अहिल्यानगर) दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ९ ट्रॅक्टर आणि २ मोटारसायकल असा एकूण ७१ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अन्य शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळली आहे.

भालचंद्र अशोक साळवी (रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व अभिजीत सुनील भांडवलकर (रा. सिव्हिल हडको अहिल्यानगर) शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी मदत करण्याचे आमिष दाखवत असत. ते शेतकऱ्यांच्या नावावर कर्जासाठी डाऊन पेमेंट भरून देण्याची आणि ट्रॅक्टर मिळाल्यावर तो त्यांच्याकडे कामाला लावल्यास मासिक ८०,०००/- रुपये देण्याची तसेच सुरुवातीचे ६ महिन्यांचे हप्ते भरण्याची व ट्रॅक्टर वापरण्याच्या मोबदल्यात ३०,०००/- रुपये महिना देण्याची खोटी आश्वासने देत.

या आमिषाला बळी पडून शेतकरी आपली आधारकार्ड, पॅनकार्ड, शेतीचे उतारे अशी महत्त्वाची कागदपत्रे आरोपींना देत. आरोपी या कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपनीकडून ट्रॅक्टरवर कर्ज काढत आणि ट्रॅक्टर मिळाल्यावर ठरल्याप्रमाणे पैसे न देता शेतकऱ्यांची फसवणूक करून ट्रॅक्टर घेऊन पसार होत असत.

या प्रकारची फसवणूक झाल्याची तक्रार एका शेतकऱ्याने राजूर पोलीस स्टेशनमध्ये (गु.र.न. ४०१/२०२५) नोंदवल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.

आरोपी भालचंद्र साळवी आणि अभिजित सुनील भांडवलकर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी आतापर्यंत ९ ट्रॅक्टर आणि २ मोटारसायकल वेगवेगळ्या ठिकाणी परस्पर विकल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने पथके पाठवून शिर्डी, अहिल्यानगर, श्रीगोंदा, नारायणगाव (पुणे) आणि सिन्नर (नाशिक) अशा विविध ठिकाणांहून चोरीचे ९ ट्रॅक्टर आणि २ मोटारसायकल हस्तगत केल्या.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संगमनेर-अकोलेचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकामध्ये अपर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील पोलीस हेडकॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धनाड, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे, संगमनेर पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयातील पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नरोडे, पोलीस कॉन्स्टेबल रत्नपारखी, पोलीस कॉन्स्टेबल परते, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप उदावंत, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार, पोलीस कॉन्स्टेबल मयूर तोरडमल अशा वेगवेगळ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकात समावेश होता.

इतर आरोपींचा शोध सुरू असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे हे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,479
गुन्हेगारी फसवणूक सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.