Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉ. संपदा मुंडे प्रकरणी रुपाली चाकणकरांविरोधात आज मुंबईत ‘निषेध मोर्चा’; उत्कर्षा रूपवते यांची प्रमुख उपस्थिती
आंदोलन

डॉ. संपदा मुंडे प्रकरणी रुपाली चाकणकरांविरोधात आज मुंबईत ‘निषेध मोर्चा’; उत्कर्षा रूपवते यांची प्रमुख उपस्थिती

रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयासमोर मोर्चा आयोजित केल्याने, या विषयावरून आता राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई: फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या कथित असंवेदनशील, स्त्रीविरोधी आणि अन्यायकारक विधानाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. 

या विधानाचा तीव्र निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत आज गुरुवारी (6 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजता मंत्रालयासमोर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयाच्या बाजूला असणाऱ्या A-4, राजगड, मॅडम कामा रोड या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

या निषेध मोर्च्याला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य असलेल्या उत्कर्षा रूपवते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. एका पीडित महिलेच्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी केलेल्या विधानामुळे पीडितेला न्याय मिळण्याऐवजी तिचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न झाला, जो अत्यंत असंवेदनशील आणि महिलांच्या न्यायप्रक्रियेला बाधा आणणारा आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

मोर्चेकरी चाकणकर यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत असून, त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्याची शक्यता आहे. तसेच, डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रकरणाची निष्पक्षपणे एसआयटी चौकशी व्हावी, या मागणीसाठीही यावेळी जोर दिला जाणार आहे. या निषेध मोर्च्यात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, महिला आघाडीचे कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. 

रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयासमोर मोर्चा आयोजित केल्याने, या विषयावरून आता राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 372
उत्कर्षा रूपवते मोर्चा रूपाली चाकणकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.