Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ४ महिन्यांत २ बळी; संगमनेरमध्ये बिबट्यांचा हाहाकार! वन विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह, RGSS ने निवेदनाच्या माध्यमातून केली चिंता व्यक्त
सामाजिक

४ महिन्यांत २ बळी; संगमनेरमध्ये बिबट्यांचा हाहाकार! वन विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह, RGSS ने निवेदनाच्या माध्यमातून केली चिंता व्यक्त

या भागातील प्रत्येक नागरिकाचा जीव धोक्यात आहे आणि यापुढे एकही जीव या प्राणघातक समस्येमुळे गमावता कामा नये. वन विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित आणि योग्य कारवाई करावी, असा आग्रही सूर निवेदनातून उमटला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/11/2025Updated:07/11/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर ग्रामीण विभागात बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार महिन्यांत दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत, तसेच अनेक पाळीव जनावरे बिबट्यांचे बळी ठरले आहेत. या गंभीर परिस्थितीवर तातडीने व ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत, राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) या संघटनेने वन अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

या भागातील प्रत्येक नागरिकाचा जीव धोक्यात आहे आणि यापुढे एकही जीव या प्राणघातक समस्येमुळे गमावता कामा नये. वन विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित आणि योग्य कारवाई करावी, असा आग्रही सूर निवेदनातून उमटला आहे.

RGSSने एका निवेदनाच्या माध्यमातून वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे या गंभीर समस्या कडे लक्ष वेधले आहे. आर एफ ओ सांगळे आणि ताम्हाणे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, बिबट्यांच्या हल्ल्यांची मालिका चिंताजनक असून, अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मेंढवण येथील हिराबाई एकनाथ बढे यांचा मृत्यू झाला, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

याव्यतिरिक्त सावरगाव तळ येथील मेंढी तळावर सुशाबाई व भास्कर हरिभाऊ पांडे हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले, तर हिवरगाव पावसा येथील अर्चना संदीप टेमगिरे यांनाही बिबट्याने लक्ष्य केले. डिग्रस येथील शाळकरी मुलगी प्रगती शाळेत जाताना वाटेत बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात जखमी झाली होती. याशिवाय, बोटा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार झाल्याने पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.

सातत्याने होत असलेल्या या घटनांमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध यांच्यात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. वन विभागाने आत्तापर्यंत काही बिबटे पकडले असले तरी, नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नरभक्षक बिबटे अजूनही मोकाट असून सार्वजनिक सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करत आहेत.

‘गोळ्या घालून ठार करा’ ते सुरक्षित कंपाऊंड; RGSS च्या प्रमुख मागण्या – या जीवघेण्या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) ने वन विभागाकडे तातडीने आणि निर्णायक पाऊले उचलण्याची मागणी केली आहे. यात आमच्या भागात सध्या सक्रिय असलेल्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याची तातडीने परवानगी द्यावी. यासोबतच, भागातील बिबट्यांचे प्रमाण लक्षात घेऊन बिबट नियंत्रणासाठी एक विशेष टास्क फोर्स ताबडतोब तैनात करावी. बिबट नियंत्रण ऑपरेशनसाठी पुरेशा प्रमाणात निधी, तंत्रज्ञान आणि तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, दीर्घकालीन उपाययोजनांसाठी बिबट्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रजनन नियंत्रण कार्यक्रमासाठी केंद्र शासनाकडे वेगाने पाठपुरावा करावा. पकडलेल्या बिबट्यांचा पुन्हा मानवी वस्तीत शिरकाव टाळण्यासाठी वन विभागाच्या हद्दीत 20 फूट उंचीचे भक्कम व सुरक्षित तार कंपाऊंड उभे करण्याची महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. तसेच, बिबट प्रवण, प्रभावित क्षेत्रातील रस्त्यालगत सूचना फलक लावणे आणि अलार्म, अलर्ट व्यवस्था कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचेही नमूद केले आहे.

या निवेदनावर राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) चे समन्वयक म्हणून अरुण चव्हाण, बाळासाहेब घोडके, कल्याण जोर्वेकर, राम अरगडे, मोहसीन रशीद शेख, शंतनू भालेकर, प्रकाश कडलग, सतीश खताळ, अमोल शेलकर, प्रदीप धाडीवाल, अरुण गावित्रे, रवींद्र हासे, अनिल राऊत, सोमनाथ हासे, अक्षय मोहिते, प्रणव नवले, गणेश जगताप, राहुल वर्पे, शशी माघाडे, ॲड. अमित सोनवणे, किशोर खताळ, सुभाष कोकणे, बाळासाहेब जाधव व मोहसीन खलील शेख आदींचा समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 771
निवेदन बिबटे हल्ले राहुल गांधी समर्थक संघ वनविभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.