Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नशेसाठीच्या इंजेक्शन (ड्रग्स) संदर्भात सखोल चौकशीची नव्या पोलीस निरीक्षकांकडे राहुल गांधी समर्थक संघाची (RGSS) मागणी
सामाजिक

नशेसाठीच्या इंजेक्शन (ड्रग्स) संदर्भात सखोल चौकशीची नव्या पोलीस निरीक्षकांकडे राहुल गांधी समर्थक संघाची (RGSS) मागणी

पोलिसांनी धाडस दाखवत गुन्हा दाखल केला याबद्दल RGSS ने पोलिसांचे कौतुक केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/11/2025Updated:10/11/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – शांत आणि सुसंस्कृत म्हणून ओळखले जाणारे संगमनेर शहर आता ड्रग्स माफीयांच्या रडारवर आले असून शहरात नशेच्या इंजेक्शनचे सर्रासपणे बेकायदा विक्री होत असल्याचे पोलिसांनी समोर आणल्याने शहरात ड्रग्सचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी समर्थक संघाने (RGSS) नव्या पोलीस निरीक्षकांची नुकतीच भेट घेत त्यांचे स्वागत करत ही मागणी केली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची भेट घेत आर जी एस एस च्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती मात्र देशमुख यांची बदली झाली. त्यामुळे त्यांच्या जागी आलेले नवे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी या प्रकरणी लक्ष घालत सखोल तपास करण्याची मागणी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बारवकर यांची भेट घेत केली आहे. संघाच्या वतीने नव्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. 

निवेदनात या देशविघातक कृत्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सध्या सुरू असलेल्या तपासात आणखी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संगमनेर शहरात ‘एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेंट शॉप’ नावाच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी वापरली जाणारी औषधे (मेफेनटर्माइन सल्फेट इंजेक्शन्स) विकणाऱ्या आदित्य किशोर गुप्ता याला अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेवर आलेला राजकीय दबाव या पार्श्वभूमीवर आरोपीचे राजकीय कनेक्शन समोर आल्याने रात्री उशिराने पोलिसांनी धाडस दाखवत गुन्हा दाखल केला याबद्दल RGSS ने पोलिसांचे कौतुक केले आहे.

त्यानंतर, त्यांनी या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळावी, यासाठी त्यांनी तपासाच्या महत्त्वाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. निवेदनाच्या माध्यमातून राहुल गांधी समर्थक संघाने (RGSS) पोलिसांना विचारणा केली की, सध्या चालू असलेल्या तपासात आरोपीसह आत्तापर्यंत किती लोकांना अटक करण्यात आली आहे आणि अटक केलेल्या आरोपींकडून नेमकी काय माहिती मिळाली आहे? या ड्रग्सचा मूळ स्रोत कोणता आहे, याचा तपास पोलिसांनी करावा. तसेच, आरोपी व्यक्तीच्या विरोधात यापूर्वी इतर गुन्हेगारी फिर्यादी आहेत का, आणि या ड्रग्सचा पुरवठा इतर व्यक्तींपर्यंत किंवा शहरांपर्यंत आहे का, याची सखोल चौकशी व्हावी.

या गुन्ह्यासाठी इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सामग्री कोठून आणि कशी मिळाली, आरोपीची पोलिस कोठडी किती दिवसांसाठी घेण्यात आली आहे? तसेच, ड्रग्सच्या नमुन्यांची शासकीय रासायनिक संशोधनाकडे पाठवणी करण्यात आली आहे का, आणि त्याचा अहवाल कधीपर्यंत अपेक्षित आहे? आदी प्रश्न उपस्थित केले. 

गुन्ह्याचा तपास आधुनिक पद्धतीने व्हावा यासाठी, आरोपी व्यक्तीच्या मोबाइल फोनच्या कॉल डिटेल्स, बँक व्यवहार, सोशल मीडिया अकाउंट्स इत्यादींची तपासणी करण्यात आली आहे का, यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे. शेवटी, या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या इतर संशयित व्यक्तींच्या शोधात तपास चालू आहे का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी राहुल गांधी समर्थक संघाचे (RGSS) पदाधिकारी एकत्र आले असून, निवेदनावर सही करणाऱ्यांमध्ये बाळासाहेब घोडके, कल्याण जोर्वेकर, राम अरगडे, मोहसीन रशीद शेख, शंतनू भालेकर, प्रकाश कडलग, सतीश खताळ, अमोल शेलकर, प्रदीप धाडीवाल, अरुण गावित्रे, रवींद्र हासे, अनिल राऊत, सोमनाथ हासे, अक्षय मोहिते, प्रणव नवले, गणेश जगताप, राहुल वर्पे, शशी माघाडे, ॲड. अमित सोनवणे, किशोर खताळ, सुभाष कोकणे, बाळासाहेब जाधव आणि मोहसीन खलील शेख यांचा समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 510
ड्रग्स निवेदन राहुल गांधी समर्थक संघ समीर बारवकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.