Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या प्रश्नाकडे शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशींनी वेधले लक्ष!
राजकारण

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या प्रश्नाकडे शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशींनी वेधले लक्ष!

सूर्यवंशी यांच्या टीकेनंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी

संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर तसेच अनेक शैक्षणिक संस्थांना जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल कोणाच्या चुकीमुळे कोसळला, हे संगमनेर शहर आणि पंचक्रोशीतील सुजाण नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या हट्टापायी आणि नियोजनशून्य कारभारामुळे ही दुर्घटना घडली.

जनतेचा तीव्र विरोध असतानाही, सत्ताधाऱ्यांनी एस.टी.पी (STP) गटारीचा जो वादग्रस्त आराखडा तयार केला, त्यातूनच या समस्येने मूळ धरले असल्याचे टीका शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे. 

सध्या पालिका निवडणुकीचे वातावरण तापत आहे या पार्श्वभूमीवर सूर्यवंशी म्हणाले, तत्कालीन खासदार स्व. बाळासाहेब विखे साहेब यांच्या निधीतून बांधलेल्या, अतिशय सुस्थितीत असलेल्या या पुलाचे गटारीचे काम सुरू करण्यासाठी सुमारे पाच फूट फाउंडेशन विनाकारण तोडण्यात आले. या कामाचे कंत्राट काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या ठेकेदाराला, तर खोदकामाचे कंत्राट एका माजी काँग्रेस उपनगराध्यक्षाकडे सोपविण्यात आले होते.

या कंत्राटदार आणि सत्ताधारी यांच्या अक्षम्य चुकीमुळे हा पूल कोसळला. धार्मिक स्थळे आणि शैक्षणिक संस्थांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा तुटल्याने शाळकरी मुलांसह परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला होता. अशा कठीण काळात, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थिती ओळखून, राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि तत्कालीन भाजप विधानसभा प्रमुख असलेले विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याला यश आले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या पूल बांधकामासाठी भरघोस निधी तातडीने मंजूर करून दिला. निधी मिळूनही ठेकेदाराकडून कामाची गती संथ असल्यामुळे, आमदार अमोल खताळ पाटील यांनी ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले आणि विद्यार्थ्यांची शाळा सुरू होण्यापूर्वीच पुलाचे काम पूर्ण करण्याची सक्त ताकीद दिली होती.

आमदार खताळ यांच्या कठोर भूमिकेमुळे आणि वैयक्तिक लक्ष दिल्यामुळेच, शाळा सुरू होण्यापूर्वीच पुलाचे काम पूर्ण झाले आणि तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला. काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी हे काम पूर्ण होऊ नये यासाठी अनेक राजकीय अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आमदार अमोल खताळ पाटील यांनी हे सर्व प्रयत्न हाणून पाडून पुलाचा प्रश्न मार्गी लावला, असे शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

एकूणच, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे पूल कोसळला आणि महायुतीच्या प्रयत्नांमुळे व आमदार खताळ यांच्यामुळेच हा महत्त्वाचा पूल कमी वेळेत पूर्ण होऊन नागरिकांची गैरसोय दूर झाली, असे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. सूर्यवंशी यांच्या टीकेनंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 642
टीका म्हाळुंगी पूल विनोद सूर्यवंशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.